file photo 
मराठवाडा

नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये....कोण म्हणाले ते वाचा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करत यापुढे ग्रामीण भागातील आठवडे बाजारासह शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली.

पत्रकार परिषदेत दिली माहिती
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १६) दुपारी चार वाजता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन उपस्थित होते.

ग्रामिण भागातील शाळा, बाजार राहणार बंद
डॉ. विपीन म्हणाले, ‘‘कोरोना आजारावर उपचार नसल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यापूर्वी महानगर भागातील शाळा, महाविद्यालये, मॉल, आठवडे बाजार, शिकवणी वर्ग, सिनेमागृह, नाट्यगृह, जलतरणिका, अभ्यासिका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.’’ ग्रामीण भागातील सर्वच शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये तसेच आठवडे बाजार ता. १३ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे डॉ. विपीन यांनी सांगितले. 

धार्मिक स्थळांचे दर्शन बंद
गुरुद्वारा, माहूर या तीर्थक्षेत्रातील दर्शनही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक झाल्यास कलम १४४ लावण्याचा विचार आहे. रेल्वेस्थानक, विमानतळ अशा ठिकाणी आरोग्य पथक राहणार आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे ते म्हणाले. आगामी काळात ट्रॅव्हल्स बंद करण्याचा विचार आहे. मास्क प्रत्येकांना लावण्याची गरज नाही. केवळ वैद्यकीय अधिकारी व रुग्णाला त्याची गरज आहे. 

जादा दराने विक्री करणाऱ्याविरुध्द कारवाइ
सेनिटायझर व मास्क जास्त दराने विक्री केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात. प्रशासन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. ९० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. भोसीकर यांनी शहरी भागात शंभर बेड, तर ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी २० बेडची व्यवस्था केल्याचे सांगितले.

अभ्यागतांनी फोनवर संपर्क करावा
गर्दीमुळे कोरोना आजार वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांनी काही दिवस येणे टाळावे. आपल्यास समस्या अधिकाऱ्यांकडे फोनवर मांडाव्यात. या बाबत सात दिवसांत निर्णय होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकाही कमी करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांना मोबाइलवर सूचना देण्यात येणार असल्याचे डॉ. विपीन यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT