जालना : पेट्रोल पंपाच्या बाहेर दुचाकीस्वारांनी केलेली गर्दी.  
मराठवाडा

दुचाकीसाठी पेट्रोल येतंय कोठून ? 

उमेश वाघमारे

जालना - संचारबंदीत रस्त्यावरील वर्दळ कमी करण्यासाठी खासगी वाहनांचा इंधन पुरवठा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ता.२७ मार्च रोजी दिले होते; मात्र या आदेशाला काही पेट्रोल पंपधारक जुमानण्यास तयार नसल्याचे चित्र आहे, परिणामी रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होण्यास तयार नाही, त्यामुळे या खासगी वाहनांना इंधनपुरवठा करणाऱ्या पेट्रोल पंपाचा शोध घेऊन कारवाई होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू केले आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने आणि सेवा सुरू आहेत. या संचारबंदी काळात रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ता.२७ मार्चपासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांची वाहने वगळता इतर सर्व खासगी वाहनांना इंधन पुरवठा करू नये, असे आदेश जिल्ह्यातील पेट्रोल पंपधारकांना दिले होते. त्यामुळे इंधन उपलब्ध झाले नाही, तर खासगी वाहनांची रस्त्यावरील वर्दळ बंद होईल अशी अपेक्षा होती.

मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. कारण शहरासह जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपधारक जिल्हाधिकारी बिनवडे यांचे आदेश डावलून खासगी दुचाकीधारकांना इंधन विक्री करीत असल्याचे चित्र आहे. परिणामी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची संख्या कमी होण्यास तयार नाही. 

त्यामुळे या संचारबंदीच्या काळात पोलिस प्रशासनाने शहरात विनाकारण फिरणाऱ्या शेकडो दुचाक्या जप्त करून त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून खासगी वाहनधारकांना इंधनपुरवठा करणाऱ्या पेट्रोल पंपांचा शोध घेऊन कारवाई करणार काय ? हाच खरा प्रश्न आहे. 

संचारबंदीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या चारचाकी, दुचाकी वाहने वगळता इतर खासगी वाहनांना इंधनपुरवठा करणाऱ्या पेट्रोल पंपांचा शोध घेतला जाईल. खासगी वाहनांना इंधनपुरवठा करणारे पेट्रोल पंप सील केले जातील. 
-रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT