file photo 
मराठवाडा

नागरिकांना किराणा, भाजीपाला घरपोच मिळणार

गणेश पांडे

परभणी : बाजारात दुध, भाजी व किराणा घेण्यासाठी लोकांची गर्दी होत असल्यामुळे उद्यापासून नागरिकांना घरपोच दुध, किराणा व भाजीपाला पोहचविला जाईल, अशी माहिती परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी (ता.२६) ‘सकाळ’शी बोलतांना दिली.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. या परिस्थितीत लोकांनी एकत्र जमणे टाळावे यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. त्यातच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीतून दररोज सकाळी ७ ते ११ पर्यंत सुट देण्यात आली होती. परंतू या वेळेत खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होतांना दिसत आहे.

गर्दी टाळण्यासाठी महत्वाचा निर्णय

क्रांती चौक, विद्यापीठ गेट, पाथरी रोड या ठिकाणी भरणारे भाजी बाजारात दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत गर्दी दिसत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी (ता.२६) महत्वाचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात संबंधीत लोकांची महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजी विक्रेत्यांना ठरावीक कॉलनीत एका ठिकाणी गाडा लावून ती भाजी लोकांच्या घरपोच द्यावी लागणार आहे. किराणा दुकानाच्या संदर्भातही हाच निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘सकाळ’शी बोलतांना दिली.



घराच्या बाहेर पडू नये
नागरिकांनी बाजारात येऊन गर्दी करू नये. अत्यावश्यक कामाशिवाय शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. आजपासून तुमच्या घरापर्यंत भाजी किराणा पोहचविला जाईल.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी
......

 


हेही वाचा ....

लाखावर नागरिकांच्या आरोग्याची माहिती
परभणी :
महापालिकेच्या आरोग्य विभागाने काही दिवसापासून शहरातील कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू केलेले असून आतापर्यंत वीस हजारांपेक्षा अधिक कुटुंबातील एक लाखावर नागरिकांची आरोग्यविषयक माहिती घेण्यात आली असल्याची माहिती, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी दिली.
महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम तर केले जातेच त्याचबरोबर जातेच त्याचबरोबर शहरात कुटुंबांचे सर्वेक्षणदेखील सुरू आहे.

अधिकची गरज भासल्यास स्क्रीनींग

महापालिकेच्या एएनएमसह आशा वर्कर आदी शंभरावर कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याच्या तपासणी करीत आहेत. आतापर्यंत २० हजार २३४ कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला असून त्यामध्ये एक लाखावर नागरिकांची आरोग्याची माहिती घेण्यात आलेली आहे. ज्यांना सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप अशी लक्षणे आढळून आली आहेत त्यांना ओपीडीमध्ये तपासणीसाठी पाठवले जात आहे. अधिकची गरज भासल्यास स्क्रीनींग करुन त्यांचा स्वँब घेऊन तपासणी पाठवला जात आहे.
शहरात ३३ होम क्वाँरंटाईन नागरिक असून त्यांची तपासणीदेखील सकाळ-दुपार-सायंकाळ महापालिकेचे वैद्यकीय पथक करते. तसेच त्यांचे अहवाल देते. ते नागरिक देखील चांगला प्रतिसाद देत असून त्यांनी घरातच राहणे पसंत केले आहे हे विशेष असे डॉ. सावंत म्हणाल्या.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मुरली + भज्जी + वॉर्न + कुंबळे! पठ्ठ्याची गोलंदाजी पाहून क्रिकेटविश्व स्तब्ध; इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दिली ऑफर

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

Bishnoi Gang: धक्कादायक! हल्लेखोर आले अन् धाड... धाड... धाड... प्रसिद्ध कबड्डीपटूला बिश्नोई टोळीनं संपवलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकीय पक्षाकडून तयारीला सुरुवात

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

SCROLL FOR NEXT