श्रीरामतांडा ( ता. मंठा) : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साफसफाई करताना कविता व गणेश राठोड. सोबत मुख्याध्यापक जगदीश कुडे 
मराठवाडा

लेकरांच्या शाळेची श्रमिक दाम्पत्याकडून साफसफाई

सुहास सदाव्रते

जालना - आम्ही ऊसतोड कामाला जातो,पण सध्या काम नाही..आमची मुलं या शाळेत शिकतात.. 
शाळेसाठी काहीतरी करावं,म्हणून आम्ही पैसे न घेता शाळेची साफसफाई केली आहे..ही प्रांजळ भावना आहे ,ऊसतोड कामगार कविता व गणेश राठोड यांची. 

श्रीरामतांडा ( ता. मंठा ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सध्या शाळा पूर्वतयारी सुरू आहे. शाळेचे मुख्याध्यापक जगदीश कुडे यांना प्रश्न पडला की, शाळा परिसरात पडलेला कचरा,तुटलेली झाडे, स्वच्छतागृहासह घाण कशी साफ करावी. अशा विचारात असताना कविता व गणेश राठोड यांनी गुरुजींना विचारले, काय चालले आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना शाळेच्या स्वच्छतेचे काम असल्याचे ते म्हणाले. हे,ऐकून क्षणाचा विलंब न करता शाळेची साफसफाई आम्ही करणार असे उत्तर कविता यांनी श्री. कुडे यांना दिले.

दोन दिवसात शाळेची साफसफाई, तुटलेली झाडे व्यवस्थित करणे आणि स्वच्छतागृहांची स्वच्छता कविता व गणेश राठोड दाम्पत्याने श्रमदान करीत मोफत केली. या दोघांना शालेय समिती अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनीही मदत केली.  झाडांची तोडताड करण्याचे काम पांडुरंग चव्हाण यांनी विनामोबदला केले.

कविता व गणेश हे प्रतिकुल आर्थिक स्‍थिती असलेल्या कुटुंबातील आहे. उसतोडीच्या कामाला किंवा इतर कामाला हे जात असतात. सध्या कुठलेच काम त्यांना नाही. शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो. आपण आर्थिक परिस्थिती अभावी शाळेला मदत करू शकत नाही, परंतु अशा पध्दतीने काम करून लेकरांची शाळा चांगली झाली पाहिजे म्हणून आम्ही हे काम केले असल्याचे कविता व गणेश राठोड यांनी सांगितले. 

दोन महिन्यापासून शाळा बंद आहे.सध्या खूपच घाण आणि अस्वच्छता झाली होती.आमच्या समोर प्रश्न होता,हे कसे करावे. पण कविता राठोड व गणेश राठोड यांनी कुठलाही मोबदला न घेता शाळेसाठी श्रमदान केले. 
- जगदीश कुडे, 
मुख्याध्यापक, श्रीरामतांडा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Inflation Impact: मॉन्सूनची मंद वाटचाल! महागाईचा मोठा फटका बसणार; जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार? सामान्यांच्या बजेटवर संकट

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update: पुण्याला यलो अलर्ट, पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

SCROLL FOR NEXT