00Nilanga paus 14.jpg
00Nilanga paus 14.jpg 
मराठवाडा

निलंगा तालुक्यात ढगफुटी, अनेक गावांचा संपर्क तुटला !

राम काळगे

निलंगा : निलंगा तालुक्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे अक्षरशः झोडपून काढले. निलंगा तालुक्यातील नऊ महसूल मंडळापैकी सात महसूल मंडळात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर उर्वरित महसूल मंडळातील अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची सोयाबीन ओढ्याला व नदीकाठी आलेल्या पाण्यामध्ये वाहून गेले.

मुख्य रस्त्यासह ग्रामीण भागातील अनेक रस्ते ओढ्याला पाणी आल्यामुळे बंद झाले आहेत. या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची व नागरिकांची दैना उडाली आहे शिवाय तालुक्यातील मध्यम प्रकल्प लघु प्रकल्प पूर्ण भरले असून मांजरा व तेरणा या दोन्ही नदीला पूर आला आहे. एकंदरीत संपूर्ण तालुका जलमय झाला असून निलंगा शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांच्या झाकून ठेवलेल्या गंजी वरील तडपत्री वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

मंगळवारी रात्री नऊ वाजता शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. निलंगा तालुक्याला सर्वाधिक फटका पावसाचा बसला आहे. या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या व झाकून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीवरील ताडपत्री उडून गेली आहे. त्यामुळे रात्रभर सोयाबीनच्या गंजी भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांनी अर्धवट स्थितीत राहिलेले सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.

मसलगा धरणाचे सहा धरवाजे उघडले 

शिवाय तालुक्यातील बडूर व मसलगा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून मसलगा मध्यम प्रकल्पातील सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तेथील पाणी सौळ मार्गे मांजरा नदी पात्रात सोडण्यात आली आहे. तर निलंगा ते कासार शिरशी मार्गे उमरगा जाणारा रस्ता लिंबाळा येथील तेरा नदीला पूर आल्यामुळे पाणी पुलावरून पडत असून हा रस्ता बंद झाला आहे. तेथील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाली आहे.

निलंगा ते तुपडी जाणारा उमरगा रस्त्यावर ओढ्याला पूर आल्यामुळे हा रस्ता बंद झाला असून कासार शिरसी मार्गे बसवकल्याण जाणारा रस्ता त्याच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. 

ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या ओढ्यांना पाणी आल्यामुळे आणि ग्रामीण भागातील रस्ते बंद असून या पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाण्याचे मोठी गैरसोय झाली आहे.
 
निलंगा शहरातील सर्व रस्ते जलमय झाले असून कांही घरात पाणी शिरले आहे. शहराजवळील ओढ्याला पाणी आले असून सर्वच शिवारातील ओढे तुडूंब भरून वाहत आहे. ग्रामीण भागातील जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. 

तालुक्यातील शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस 

निलंगा- १३१ मी.मी, कासारबालकुंदा - १२४ मी.मी, मदनसुरी- १०७ मी.मी, कासारसिरशी १२४ मी.मी, हलगरा- ११४ मी.मी, आंबुलगा -१२४-मी.मी, भुतमुगळी- १२२ मी.मी या सात महसूल मंडळात शंभरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर पानचिंचोली ७५ मी.मी, निटूर ८५ मी.मी, औरादशहाजानी ८३ मी.मी. अशी सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. 

येथील शेतकर्यांचे नुकसान 
तेरणा नदीच्या पुरामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या गंजी वाहून गेले आहेत. सांगली जेवरी येथील संतोष घाडगे, उल्हास सरतापे, अंकुश सरतापे, बाळू राठोडे, शिवाजी सरतापे, शिवाजी बिराजदार, संजय पाटील, राम राठोड, रामकिसन राठोडे, लक्ष्मण सरतापे आदी गावातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर गुंजरगा, येळणूर, तगरखेडा, सावरी, मानेजवळगा, शिरोळ-वांजरवाडा, बसपूर, गिरकचाळ, वळसांगवी यासह आदी गावातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT