केदारखेडा : थंडीचा कडाका वाढल्याने शेकोटीचा आधार घेताना ग्रामस्थ.  
मराठवाडा

ग्रामीण भागात हुडहुडी... 

सकाळ वृत्तसेवा

केदारखेडा (जि.जालना) - ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. परिसरात पहाटे तसेच सायंकाळी अनेकजण शेकोटीचा आधार घेताना दिसले. 

भोकरदन तालुक्‍यातील केदारखेडा, जवखेडा ठोंबरे परिसरात पहाटे धुके दाटण्यासह कडाक्‍याची थंडी जाणवत आहेत. पहाटेच शेतात कामे करणाऱ्यांचे हाल होत आहेत.  थंडीमुळे पहाटे घराबाहेर पडणे ग्रामस्थ टाळत आहेत. दिवसभर अनेकजण स्वेटर, जाकेट, मफरल, उबदार कपडे परिधान करून वावरताना दिसत आहेत. शेतशिवारासह घरासमोर, सार्वजनिक ठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासूनच बचाव करताना ग्रामस्थ दिसत आहेत. शेतशिवारांत धुके दाटत असल्याने पिकांना फटका बसण्याची भीती शेतकरी व्यक्‍त करीत आहेत. 

धुक्‍यासह थंडीचा कडाका 
वरूड बुद्रुक : जाफराबाद तालुक्‍यातील वरूडसह परिसर पहाटे दाट धुक्‍याने व्यापलेला पाहण्यास मिळाला. त्यातच थंडीत वाढ झाली आहे. वरूडसह कोळेगाव, सांजोळ, कोनड, गोपी, सोनगिरी, वानखेडा, भारज, सोनखेडा, सावरखेडा या गावांत धुक्‍याची चादर पसरली होती. त्यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. या धुक्‍यामुळे गावातील रस्ते आणि परिसर त्यात हरवून गेलेला पाहायला मिळाला. वातावरणातही नेहमीपेक्षा थोडा जास्त आल्हाददायक गारवा जाणवत होता. त्यातच ग्रामस्थ स्वेटर, मफलर, ऊब देणाऱ्या कपड्यांचा आधार घेत थंडीपासून बचाव करताना दिसले. दरम्यान, धुक्‍यासह अल्पप्रमाणात पाण्याचे थेंब पडत होते, त्यामुळे पाऊस पडल्याचा भास निर्माण होत होता. 

धुक्‍यात हरवले शहागड 
शहागड : अंबड तालुक्‍यातील शहागड परिसर धुक्‍यात हरवल्याचा दिसत होता. परिसरात पहाटे मोठ्याप्रमाणात पाणधुई आल्याने परिसरात थंडीसह पाण्याचे तुषार अंगावर पडत होते. त्यामुळे आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळाले. थंडीत वाढ झाली आहे. महामार्गावर पहाटे चालकांना वाहनांचे दिवे सुरू ठेवावे लागले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : भारतात प्रवेश करणाऱ्या 79 कैद्यांना अटक

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT