Hingoli photo 
मराठवाडा

हिंगोलीकरांना दिलासा; कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल आला निगेटीव्ह

राजेश दारव्हेकर

हिंगोली: येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात उपचारघेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसाचा कालावधी संपल्यानंतर पाठविलेला पहिला स्वॅब नमुना निगेटीव्ह आला आहे. याबाबतचा अहवाल बुधवारी(ता.१५) प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाला सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळून आल्याने ता. ३१ मार्च रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना

त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ विविध उपाययोजना हाती घेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्णय घेतले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी तातडीने नियोजन करून उपाययोजना हाती घेतल्या. 

चौदा दिवसांचा कालावधी संपला

सर्वच यंत्रणांनी दिलेली जबाबदारी पार पाडली. आरोग्य विभागाने संबंधीत रुग्णांची व्यवस्थीत काळजी घेतल्याने त्याला गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले नाही. त्यानंतर त्याचा आयसोलेशन वॉर्ड मधील चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर त्याचे ४८ तासाच्या अंतराने स्वॅब नमुने औरंगाबाद येथे पाठविले होते. 

आरोग्य विभागाला अहवाल प्राप्त

त्यापैकी पहिला अहवाल बुधवारी (ता. १५) सायंकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्याचा पहिला अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यानंतर आता दुसरा अहवाल गुरुवारी (ता. १६) प्राप्त होणार आहे. पहिला अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

४२ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह 

दरम्यान, येथील आयसोलेश वार्डात बुधवारपर्यंत (ता.१५) एकूण ४३ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यातील ४२ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. शासकीय क्‍वांरटाईन सेंटर वसमतमध्ये १२ जण असून दोघांचा अहवाल प्रलंबित  असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

जिल्हा प्रशासन सतर्क

कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. तरीही प्रशासन कोरोनाबाबत सतर्क असून बाहेरजिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जात आहे. तसेच सर्दी, खोकला आदी लक्षणे असल्यास तत्काळ उपचार केले जात आहेत. पोलिस प्रशासनासह, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य विभाग दक्ष असून त्यादृष्टीने उपाययोजना राबविल्या जात आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

UP Jobs : २ लाख STEM ग्रॅज्युएट्सना मिळणार ग्लोबल संधी! १५ कंपन्यांचे मोठे करार, हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो नोकऱ्यांची शक्यता

SCROLL FOR NEXT