मराठवाडा

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस? या महत्वाच्या जागेवर कॉंग्रेसचा दावा

Maharashtra Congress: कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत झाला सर्वानुमते ठराव ; महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी वाढली स्पर्धा

अविनाश काळे

Marathawada: दलित मतदारांच्या बहुसंख्येमुळे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा मतदारसंघात काँग्रेसने तीन वेळाही दलित समाजाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती.

आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ कॉंग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न रहाणार असल्याने कार्यकर्त्यांनी मतदाराला देव आणि मतदार संघाला मंदिर समजुन सक्रियपणे काम करावे. असे आवाहन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक महेश देशमुख यांनी केले.

उमरगा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने गुरुवारी (ता. १८) कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. देशमुख बोलत होते. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. सुभाष राजोळे अध्यक्षस्थानी होते.

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, उमरगा बाजार समितीचे माजी सभापती नानाराव भोसले, जेष्ठ नेते बलभिमराव पाटील, बापु शिंदे, संजय चालुक्य, विकास हराळकर, मधुकर यादव, राजू तोडकरे, अँड. अशोक पोतदार, प्रकाश चव्हाण, अजय वाघमारे आदींची उपस्थिती होती.

श्री. देशमुख यांनी पक्षांतर केलेल्या नेत्यावर टिका केली. कॉंग्रेस पक्षाने त्यांना भरभरून दिले होते ; तरीही त्यांनी पक्ष सोडला. नेत्याबरोबर कार्यकर्त्यांचे भावनिक नाते होते, परंतु त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार केला का ? असा प्रश्न करून श्री. देशमुख यांनी तालुक्यात काँग्रेसबरोबर जनमत आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय रहावे.

विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारासाठी आपण प्रयत्न करू पण ऐनवेळी महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षाला उमेदवारी मिळाली तरी सर्वांनी एकसंघ राहिले पाहिजे. असे आवाहन केले.

या वेळी राजु तोडकरी, बलभिमराव पाटील, संजय चालुक्य, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, अशोक गायकवाड, संजय सरवदे आदींनी काँग्रेस पक्षाचा इतिहास सांगून, एका नेत्यामुळे पक्षाचे कार्य थांबत नाही. कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्या जोमाने काम करण्याचे आवाहन केले. मधुकर यादव यांनी प्रास्ताविकात तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या इतिहासाची माहिती सांगितली. मधुकर बिद्री यांनी आभार मानले.

काँग्रेससाठी जागा देण्याचा झाला ठराव

राहुल गांधी यांची संसदेच्या विरोधी नेतेपदी निवड झाल्याने बैठकीत तालुकाध्यक्ष अँड. राजोळे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला तसेच उमरगा विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला देण्याचा ठराव मांडला, त्याला सर्वानुमते संमती दिली. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड झाल्याने महेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेले विजय वाघमारे यांचे भाषण झाले, त्यांनी निष्ठावंत व सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT