file photo 
मराठवाडा

परभणीकरांना दिलासा;‘त्या’ तिघांचे स्वॅब निगेटिव्ह

गणेश पांडे

परभणी :  दिल्ली येथील तबलिकी जमातीत सहभागी होऊन परभणी जिल्ह्यात परत आलेल्या तिघांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी (ता.दोन) पुणे येथील प्रयोग शाळेचा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे.

दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात असलेल्या एका धार्मिक स्थळात मोठ्याप्रमाणात लोक जमल्याची बाब दिल्ली सरकारने उघड केली. त्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. या ठिकाणी जमलेल्या हजारो लोकांपैकी अनेकांना कोरोनाची लक्षणे असल्याचे समोर आले आहे. काही जण तर कोरोना विषाणुच्या संसर्गात आल्याचे ही उघड झाले आहे. या तबलिकी जमातीमध्ये परभणीतील तिघे असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मिळाली होती. हे तिघेही १३ मार्च रोजीच परभणीत आले होते. दिल्लीतील तबलिकी जमातीतून आलेल्या लोकांचा शोध घ्यावा, असे आदेश राज्यशासनाने जिल्हाधिकारी परभणी यांना दिले होते. त्यानुसार त्यांचा मंगळवारी (ता.३१) शोध घेण्यात आला. त्या तिघांचा शोध घेवून त्यांना मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅब मंगळवारी घेवून पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आला होता. त्या तिघांचे ही अहवाल गुरुवारी (ता.दोन) प्राप्त झाले असून निगेटिव्ह आले आहेत.

हेही वाचा - आता परभणीच्या सुरक्षेत वाढ !

सेलूतील संशयिताचा घेतला स्वॅब नमुना
 सेलू (जि.परभणी) शहरातील एक व्यक्तीचा कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या व्यक्तीसोबत संपर्कात आला असल्याने या संशयित व्यक्तीला बुधवारी (ता.एक) रात्री उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संशयितांची आरोग्य तपासणी केली असता कोणतेही लक्षणे आढळून आले नसले तरी, पुढील उपाययोजना म्हणून या ठिकाणी सुरू केलेल्या आयोसेलेशन कक्षात भरती करण्यात आले.


२१५ जण संशयित दाखल
परभणी जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नसतानाही मात्र, संशयित रुग्णांच्या संख्येत झापट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (ता. दोन) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात २१५ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. १२९ रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले आहेत. हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य कक्षात ४४ जण आहेत. ४२ जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. परदेशातून आलेले ६१, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांवर आरोग्य पथकाची नोंद करण्यात आली आहे. कोरोना विषाणुच्या संदर्भात तपासणीसाठी २७ संशयीतांचे स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणु संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. गुरुवारी (ता.दोन) दिवसभरात २७ संशयीत रुग्ण दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सोलापूरच्या 'मटका किंग'चं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून उडाळी खळबळ, मंदिरातील अनागोंदी कारभाराविरोधात संताप

South Solapur News: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोळी कुटुंबाच्या मदतीला धावले महादेव कोगनुरे

Latest Marathi News Update : ज्ञानेश कुमारांमुळे मोदी सत्तेत आले : अभिजीत दिपके

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT