संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

बांधकामे ठप्प झाल्याने कामगारांचे हाल 

सुभाष बिडे

घनसावंगी (जि. जालना) -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बांधकामे ठप्प झाल्याने कामगारांचे हाल होत आहेत. अनेक कामगारांची नोंदणी नाही. त्यामुळे मदतीपासूनही ते वंचित आहेत. 

बांधकामांवर सेंट्रिंग काम करणारे, बांधकाम मिस्तरी व त्यांच्या हाताखाली काम करणारे बिगारी कामगार यांचे हातावर पोट असते. रोज मजुरी करायची, आठवड्याचा पगार घ्यायचा, बाजार करायचा अन् त्यावर संसाराचा रहाटगाडा चालवायचा, असा त्यांचा क्रम असतो.

महिनाभरापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बांधकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांचे हाल होत आहेत.

लॉकडाउन सुरू झाल्यापासून बांधकामे थंडावली आहेत. त्यामुळे बांधकाम करणारे मजूर, मिस्तरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नोंदणीकृत बांधकाम कामगारांबरोबर इतर बांधकाम कामगारांना भत्ता देण्यात यावा. लॉकडाउनच्या काळात इतर व्यवसायांप्रमाणे बांधकाम कामांना सरसकट सूट द्यावी. 
- बंडू चालके, 
बांधकाम कंत्राटदार 

हाताला काम नाही. घरची जबाबदारी माझ्यावर असल्याने कुटुंबाचे पोट कसे भरायचे, असा प्रश्‍न आहे. रेशनवरील धान्य किती दिवस पुरणार? हाताला काम मिळाले की रोजीरोटीचा प्रश्‍न सुटेल. त्यामुळे बांधकामास लॉकडाउनमध्ये शासनाने सरसकट सूट द्यावी. जेणेकरून सर्व बांधकाम कामगारांना काम मिळून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. 
- महादेव रुचके, 
बांधकाम मिस्तरी 

आम्ही बांधकामावर सेंट्रिंगसह मिस्तरीच्या हाताखाली काम करतो. महिनाभरापासून हाताला काम नाही. घरी बसून आहोत. काम मिळाले तर पोटापाण्याची सोय होते. आमच्यासह अनेक बांधकाम मजुरांचे हातावर पोट असते. शासनाने याचा विचार करावा. 
- परमेश्‍वर गायके, 
बांधकाम कामगार 

आम्ही मिस्तरीच्या हाताखाली काम करतो. आठ दिवस काम केल्यावर मजुरी मिळते. महिनाभर झाले कामे बंद झाली आहेत. घरातील जीवनावश्‍यक वस्तू संपत आल्या आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च कसा करावा, याची चिंता लागली आहे. 
- संतोष घोटे, 
मजूर कामगार 

एक महिन्यापासून बांधकामे बंद असल्याने हाताला काम नाही. घराची जबाबदारी माझ्यावर आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काम बंद असल्याने बांधकाम कामगारांची उपासमार होत आहे. त्यासाठी शासनाने आम्हाला मदत द्यावी. 
- शेख अलीम शेख रशीद, 
मजूर कामगार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT