korona 
मराठवाडा

कोरोना: आरोग्य तपासणीनंतरच गावकऱ्यांना प्रवेश  

संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामधून कामानिमित्त स्थलांतर केलेल्या नागरिकांना गावबंदी करण्यात येत असल्यामुळे अनेक गावांमधून वादाचे प्रकार घडत आहेत. आरोग्य तपासणी करून आलेल्या नागरिकांना गावात प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, यामध्येही आरोग्य तपासणीकरिता पाठवण्यात आलेले काही नागरिक परस्पर नातेवाईकांकडे गेल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागामधूनही जनमानसामध्ये भीती व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन व प्रशासनाकडून करण्यात येणारी जनजागृती आता ग्रामीण भागामधील शेवटच्या नागरिकापर्यंत पोचली असल्याचे चित्र आहे. या आजाराचा सामना करण्याकरिता प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु, कामासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथे स्थलांतर करणाऱ्या ग्रामीण भागातील कामगार व मजूर गावाकडे परतले आहे. 

तपासणी करून घेतल्यानंतरच गावात प्रवेश

कामगार व मजुरांच्या माध्यमातून गावामध्ये हा आजार पोहोचू नये, याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांनी व गावकऱ्यांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.  पुयना, वारंगा मसाई, सोडेगाव, कळमकोंडा येथील गावकऱ्यांनी गावच्या वेशीवरच नागरिक व तरुणांची २४ तासाची गस्त बसविली आहे. गावात कुठल्याही नागरिकाला प्रवेश दिला जात नाही. गावामधील स्थलांतर करणाऱ्या मजूर व कामगारांना गावाकडे परत आल्यानंतर आरोग्य तपासणी करून घेतल्यानंतरच गावात प्रवेश दिला जात आहे.

इतरत्र निवारा घेतल्यामुळे संशय

यामुळे काही ठिकाणी गावी परत येणारे कामगार, मजूर व गावकऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. सिंदगी येथील गावी परतणाऱ्या मजुरांना आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर आरोग्य तपासणी करून आल्याचे कागदपत्र सरपंच व पोलिस पाटील यांना दाखवविले. त्यानंतरच या मजुरांना गावात प्रवेश देण्यात आला. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या काही जणांनी आरोग्य तपासणी न करता इतरत्र नातेवाईकाकडे निवारा घेतल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संशय व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावकऱ्यांचा जागता पहारा

ग्रामीण भागामधून गावकऱ्यांनी गावाची वेस बंद करत जागता पहारा ठेवल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस व आरोग्य तपासणी संदर्भातील कागदपत्रे पाहूनच गावात प्रवेश दिला जात आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुणे, मुंबई येथून परतलेल्या १२८ महिला नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जर्मनीहून परतलेल्या एका व्यक्तीला होम क्‍वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर-धुळे मार्गावर भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू, टाटा नेक्सॉनचा चुराडा

CM Yogi Adityanath: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे! योगी सरकारकडून ४६० कोटींचा 'बंपर' डोस; २.५१ लाख लाभार्थींना मिळाला थेट फायदा

Latest Marathi News Live Update : "प्रधानमंत्री मोदींचा अजमेरला भव्य कार्यक्रम 28 तारखेला ठेवत आहोत"- राजस्थान विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी

Maharashtra Police Bharti : वर्दीसाठी ओढ! नाशिक ग्रामीण पोलीस भरतीला प्रारंभ; ९७ हजार अर्जांमधून कोणाची लागणार वर्णी?

Hill Station: हिल स्टेशन विसरा! 'हे' धबधबे पर्यटकांना लावतायत वेड; कधीकाळी नक्षलवाद्यांचा गड असलेली जागा आता बनली 'पिकनिक स्पॉट'

SCROLL FOR NEXT