Nanded Photo 
मराठवाडा

कोरोना इफेक्ट : भुकेल्यांनो तुम्ही फक्त आवाज द्या...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून ‘आचारसंहितेत लॉयन्सचा डबा’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुक्रवारी (ता.२७ मार्च २०२०) खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रेल्वे स्थानक, सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना जेवणाचे डबे देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, लॉयन्स सेंट्रल अध्यक्ष डॉ. विजय भारतीया, सचिव डॉ. मोहन चव्हाण, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, सफायरचे कोषाध्यक्ष संदीप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कलकत्याहून आलेल्या व शहरात अडकलेले १४ प्रवाशांना, रेल्वे स्टेशन परिसरात बंदोबस्ताला असलेले पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, अपंग व गरजू निराधार यांना मान्यवरांच्या हस्ते पोळी व भाजी असलेले डबे देण्यात आले. मागील नऊ वर्षापासून ‘भाऊचा डबा’ व दोन वर्षांपासून ‘लॉयन्सचा डबा’ नियमितपणे सुरु आहे. या दोन्ही उपक्रमाचे नांदेडकरांनी तोंडभरुन कौतुकच केले नाही तर, त्यांच्या या अभिनव उप्रमास भरभरून प्रतिसाद दिला आहे.

 हेही वाचा-  video - ‘लॉकडाऊन समजून घेना भाऊ...उगाच त्रास नको देऊ’

यांनी प्रत्येकी २०० डब्बे देण्याचा निर्धार केला 
लॉयन्स क्लब नांदेड सफायरच्या सर्व सदस्यांनी मिळून शुक्रवारी पहिल्याच दिवशी एक हजार डब्यांचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमास मराठा वीज कर्मचारी संघटनेने देखील ४०० डबे देण्याची तयारी दर्शवली आहे. श्रीमती पद्मावती विश्वनाथ अनंतवार यांच्याकडून तीनशे डबे, तर सुभाष बंग, संदिप काला, आदित्य जाजू, रघुनाथ चक्रवार, हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २०० डब्बे देण्याचा निर्धार केला आहे. याशिवाय अद्वैत उंबरकर, ज्ञानेश्वर महाजन, विकास लव्हेकर, मयूर मोदी, प्रा. दीपक बच्चेवार, व्यंकटेश पारसेवार, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी.एच.अग्रवाल, अखिल गुप्ता, गणेश महाजन, राघव दंडे, मनोहर देवणे, नमिता पुरणाले यांनी प्रत्येकी शंभर डबे दिले.

हेही वाचलेच पाहिजे-  Video : कोरोना मला स्पर्शही करू शकत नाही, असं कोण म्हणतंय ते वाचाच

स्वंयसेवकामार्फत घरपोच डबा लॉयन्सचा डबा
याशिवाय प्रत्येकी पन्नास डबे देण्यासाठी अजय राठी, महेंद्र चव्हाण, राम दरक, अजय बाहेती, अनिल लड्डा, अजय राठी, निकेश मुनोत, संदिप अग्रवाल, पी. दांडेगावकर, अमर धूत, एस.एन.सिद्धान्ती यांनी संमती दिली आहे.
समाजमाध्यमातून आवाहन केल्या नंतर शेकडो विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, नर्स, मनपा कर्मचारी, अपंग व्यक्ती अशा गरजवंताना डबा देण्यासाठी मागणी केल्यामुळे स्वयंसेवक राजेशसिंह ठाकूर व मन्मथ स्वामी यांनी प्रत्येकाला घरपोच लॉयन्सचा डबा पोहचता केला.

 

गरजवंतांनी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलशी संपर्क साधा
पहिल्या दिवशी २४० डबे दिले असून आचारसंहिता संपेपर्यंत दररोज लॉयन्सचा डबा वितरीत करण्यात येणार आहे. डबे देणाऱ्या अन्नदात्यांनी आणि डब्याची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांनी व इतर गरजवंतांनी लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या सदस्यांशी संपर्क साधावा.
- दिलीप ठाकूर (प्रोजेक्ट चेअरमन)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

SCROLL FOR NEXT