फोटो 
मराठवाडा

कोरोना : आता दमरेचाही कोरोनाविरुध्द लढा 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेने कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याकरिता विविध उपाय योजना केल्या आहेत. या अंतर्गत सोमवारी (ता. १६) मार्च रोजी महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी दक्षिण मध्य रेल्वे मधील सर्व डीआरएम. तसेच विविध स्तरावरील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक घेवून विविध योजनांची माहिती दिली. तसेच व्हिडीयो कॉन्फर्सिंगद्वारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना आरोग्य मंत्रालय आणि रेल्वे बोर्डातील उच्च वैद्यकीय विशेषज्ञ मार्फत या रोगाचा प्रसार रोखण्याकरिता करावयाच्या कार्यवाही बाबत प्रशिक्षण देण्यात आले.
  
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड, हैदराबाद, सिकंदराबाद, विजयवाडा, गुंटूर आणि गुंटकळ या सहा  विभागातील २७ ठिकाणी कोरोनागृस्तांना ठेवण्याकरिता १०१९ बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रेल्वे विभागातील वैद्यकीय अधिकारी संबधित राज्य सरकारच्या आरोग्य विभागाशी संपर्क ठेवून आहेत. जेणेकरून या विषाणूच्या प्रसार रोखता येईल.

या शिवाय रेल्वे प्रसाशानातर्फे उपाययोजना
  

दक्षिण मध्य रेल्वेमधील सर्व मुख्य रेल्वे गाड्या आणि मुख्य रेल्वे स्थानकावर या व्हायरसचा प्रसार रोखण्याकरिता रेल्वेस्थानकावरील बेंचेस, सीट्स, प्लाटफॉर्म सरफेस, रेलिंग, लिफ्ट्स, एस्केलेटर्स, एस्केलेटर्स हेंडल आणि तिकीट खिडकी समोरील दांडे, स्वच्छता गृहाचे दरवाजे, हेंडल, इत्यादी स्वच्छ/निर्जंतुक  केले जात आहेत. तसेच रेल्वे डब्यांमध्येही स्वच्छता/निर्जंतुकीकरण  केली जात आहे.  रेल्वे स्थानकावरील आणि रेल्वे गाड्यामधील प्रसाधन गृहामध्ये, तसेच बेसिनमध्ये लिक्विड सोप आणि साबणची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये काम करत असलेले ओ.बी.एच.एस. कर्मचाऱ्यांना रेल्वे डब्यांमध्ये व्यवस्थीत स्वच्छता ठेवण्यास सांगितलं आहे. 

१५ एप्रिलपर्यंत वातानुकुलीत डब्यांचे तापमान २५ डिग्रीपर्यंत 

वातानुकुलीत डब्यांमधील पडदे तत्काळ प्रभावाने काढण्यात आले आहेत. या स्वच्छता/निर्जंतुकीकरण   सोबतच खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे मधील वातानुकुलीत डब्यांत देण्यात येणाऱ्या वुलन ब्लांकेट (लोकरीची चादर) रेल्वे प्रवाशांना ता. १५ एप्रिलपर्यंत त्यांनी मागितल्या तरच देण्याचे ठरविण्यात आले आहे. ते वुलन ब्लांकेट घरून आणू शकतात. या बद्दल वातानुकुलीत श्रेणीतील रेल्वे प्रवाशांना एस.एम.एसद्वारे कळविण्यात आले आहे. वातानुकुलीत डब्यांमध्ये बेड शिट्स, पिलो कव्हर आणि नेपकिन या प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच देण्यात येतील. तसेच ता. १५ एप्रिलपर्यंत वातानुकुलीत डब्यांचे तापमान २५ डिग्रीपर्यंत ठेवण्याचे आदेश संबंधितास देण्यात आले आहेत.

प्रवाशांना आवाहन

प्रवाशांनीही कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याकरिता रेल्वे प्रशासन करत असलेल्या प्रयत्नास सहकार्य करावे तसेच रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता पाळावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT