पिंपळगाव रेणुकाई : बहरलेल्या निसर्गाच्या वातावरणाचा आनंद घेताना पर्यटक.  
मराठवाडा

निसर्गाच्या सौंदर्यावर पडेना नजर 

प्रकाश ढमाले

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) -  अजिंठा पर्वतरांगांतील विविध ठिकाणची सौंदर्यसृष्टी, हिरवे हिरवेगार गालिचे अंथरलेला डोंगरमाथा, दऱ्यांसह धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक, निसर्गप्रेमी सहकुटुंब परिसरात येतात. यंदा मात्र कोरोनामुळे चित्र बदलले आहे. येथे येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. 

मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा त्रिवेणी संगमात असलेल्या अजिंठा पर्वतरांगांमध्ये देवदेवतांच्या ठिकाणासह नयनरम्य निसर्ग दडलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील लेणीपासून प्रवास करणाऱ्या या पर्वतरांगा सोयगाव, भोकरदन तालुक्यां‍च्या कडेने प्रवास करीत बुलडाणा जिल्ह्याकडे जातात. या पर्वतरांगांमध्ये सिल्लोड तालुक्‍यातील अंबऋषी, भोकरदन तालुक्‍यातील कालिका माता, जाळीचा देव ते बुलडाणा जिल्ह्यातील अस्तित्वात येत असलेले शेगावचे उपस्थान गीरडा, भैरवनाथ अशी अनेक देवस्थाने आहेत. त्याचबरोबर काळी भिंत, मेहगाव नदीवरील वडाळीदजवळील सीडी घाट असा निसर्गरम्य परिसरही आहे. या ठिकाणी पावसाळ्यात, श्रावणात मोठी गर्दी होते.

कालिकामाता मंदिर हे डोंगरात दोन किलोमीटर खोल दरीमध्ये वसलेले आहे. येथे नियमित भाविक दर्शनासाठी येत असतात. जाळीचा देव हे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून महानुभाव पंथाचे लोक पायी दिंड्यांसह येतात; तसेच येथून जवळच असलेल्या गिरडा येथे शेगावचे उपस्थान निर्माण केले जात आहे. येथील निसर्गरम्य ठिकाणही वाखाणण्याजोगे असून काळी भिंत ही प्रसिद्ध मानली जाते. तर सीडी घाट हे एक वेगळेच निसर्गरम्य ठिकाण या डोंगररांगांना लाभले आहे.

नेहमी खळखळणारे पाणी, घनदाट जंगल, मनाला मोहिनी घालणारे धबधबे, पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा आवाज, घनदाट जंगलात घुमणारा पर्यटकांचा आवाज असे रम्य वातावरण येथे असते. पावसाळ्यात तर येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते; मात्र यावर्षी कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण पाहून भाविक, पर्यटकांनी यंदा घरीच थांबणे पसंत केलेले आहे. परिणामी पर्यटकांनी यंदा पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवली आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT