corona patients son give threats  
मराठवाडा

मला उपचारासाठी दाखल करा; अन्यथा मी गावभर फिरेन

संतोष जोशी

उदगीर (जि. लातूर) -  ‘मला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करा; अन्यथा मी गावभर फिरेन’, अशी धमकी कोरोनाबाधित रुग्णाच्या मुलाने दिली. हा प्रकार तालुक्यातील शिरोळ येथे घडला. 

येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल सोमवारी (ता.१३) पॉझिटिव्ह आला. ग्रामपंचायतीने कोरोनाबाधित रुग्णाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला. दरम्यान, मंगळवारी (ता. १४) या व्यक्तीच्या १६ वर्षीय मुलालाही सर्दी झाली; परंतु आरोग्य विभागाला कळवूनसुद्धा या कुटुंबीयांतील एकाही सदस्याला घेण्यासाठी दोन दिवसांपासून रुग्णवाहिका आली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. याबाबत ग्रामसेवक, सरपंच, आरोग्यसेविका, आरोग्य अधिकारी यांनीही आरोग्य विभागाला माहिती दिली. पण, संबंधित मुलावर उपचार झाले नाहीत. त्यामुळे ‘मला सर्दी झाली आहे, तातडीने उपचारासाठी दाखल करा; अन्यथा मी गावभर फिरेन’, अशी धमकीच मुलाने दिली. 

एका किड्याने हलविली अख्खी पाणीपुरवठा यंत्रणा ! 
  
रागाच्या भरात बोलला 
माझ्या वडिलांना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर लातूर येथे उपचार चालू आहेत. लहान भावाला सर्दी आणि ताप आहे. याबाबत आशाताई, आरोग्य अधिकारी यांना सांगितले; पण थोड्या वेळाने रुग्णवाहिका येईल असे सांगत दोन दिवसांपासून काहीही केले नाही. सर्व नेते, अधिकारी यांना फोन केले; तरीही रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही व्यवस्था केली गेली नाही. यामुळे तातडीने उपचार व्हावेत म्हणून चिडून रागाच्या भरात लहान भाऊ गावात फिरेन असे म्हणाला आहे. आम्ही त्याला गावात फिरू देणार नाही, असे संबंधित मुलाच्या भावाने सांगितले. 

ग्रामपंचायतीने कोरोनाबाधित रुग्णाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. कुटुंबातील एका मुलाला सर्दी असल्याचे आरोग्यसेविकेने कळविले आहे. रुग्णवाहिका येणार आहे असा निरोप होता; पण बुधवारी (ता. १५) रुग्णवाहिका आली नाही. 
- मुरलीधर धोंगडे, ग्रामसेवक, शिरोळ. 
 

(संपादन : विकास देशमुख)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT