संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र. 
मराठवाडा

जालना कोरोना : ४५ बरे, २७ जणांची भर 

उमेश वाघमारे

जालना -  कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर वाढत असल्याचे चित्र असून, बुधवारी (ता. २२) दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांनी गुरुवारी (ता.२३) सांगितले आहे. त्यामुळे आतापर्यंत ५८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर गुरुवारी (ता.२३) ४५ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल ९८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, रात्री उशिरा २७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने जिल्ह्यात तब्बल एक हजार ६०६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्ह्यात तब्बल एक हजार ५७९ कोरोनाबाधित रुग्ण मागील पावणेचार महिन्यांत आढळून आले आहेत. त्यापैकी ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. २२) जालना कोविड रुग्णालय येथे उपचार सुरू असलेल्या आरपी रोड परिसरातील ७४ वर्षीय पुरुषाचा व गौतमनगर येथील ७५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

उपचारानंतर गुरुवारी ४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात जालना शहरातील संभाजीनगर येथील १६, कादराबाद, रामनगर येथील प्रत्येकी पाच, पंचशील रुग्णालय परिसर येथील चार, मस्तगड येथील तीन, लक्कडकोट, मोदीखाना, बसस्थानक परिसर येथील प्रत्येक दोन, तर कुंभारगल्ली, गोपालनगर, चंदनझिरा, तट्टूपुरा, कन्हैयानगर, रहेमानगंज येथील प्रत्येकी एक कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाला आहे. तर रात्री २७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही तब्बल एक हजार ६०६ झाली आहे.

सध्या जालना येथे ५२३ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ४० जणांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात ८०७ जणांचे संस्थात्मक अलगीकरण 

जिल्ह्यात ८०७ जणांचे गुरुवारी (ता.२३) संस्‍थात्‍मक अलगीकरण करण्यात आले. यात जालना पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०२, मोतीबाग शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ३१, वनप्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १६६, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ६३, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे ४८, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ४९, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे ५४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे ५६, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ६१, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे सहा, परतूर येथील केजीबीव्ही येथे दोन, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे सात, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे २७, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २७, घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे सात, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे तीन, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ६०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २३, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे आठ, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे सातजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT