संग्रहित चित्र. 
मराठवाडा

जालन्यात कोरोनाचा दुसरा बळी, पंचवीस पाॅझिटिव्ह

महेश गायकवाड

जालना -   जिल्ह्यात सोमवारी (ता.एक) कोरोनाचा दुसरा बळी गेला असून नवीन पंचवीस रूग्णांची भर पडल्याने जालन्याला धक्यामागून धक्का बसला आहे.   नवीन पंचवीस रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या १५३ झाली आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालयात सोमवारी मोदीखाना परिसरातील एक साठ वर्षीय व्यक्ती   अत्यावश्‍यक स्थितीत उपचारासाठी दाखल झाला होता. मात्र, अर्ध्या तासात या व्यक्तीचा मृत्यू झाला.

या व्यक्तीच्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल मंगळवारी (ता.दोन) पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे.  या मृत्यूमुळे कोरोनाचा जिल्ह्यात दुसरा बळी ठरला आहे. 

दरम्यान,   मंगळवारी सकाळी  पुन्हा २५ संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त  झाल्याने एकुण बाधितांचा आकडा १५३ झाला आहे. नव्याने बाधित आढळुन आलेल्या २५ रूग्णांमध्ये परतूर तालुक्यातील मापेगाव येथील ८,बदनापूर २,जालना तालुक्यातील सामनगाव येथील ३, पिरपिंपळगाव १,जाफराबादमधील १,   यावलपिंप्रीतील १ व जालना शहरातील विविध भागातील सहा व्यक्तीचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT