संग्रहित चित्र. 
मराठवाडा

कोरोनाबाधित महिलेचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

जालना -  जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या ६५ वर्षीय महिलेचा दुसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या नमुन्याचा अहवाल बुधवारी (ता.१५) रात्री पॉझिटिव्ह आला आहे. 

शहरातील दुखीनगर भागातील एका महिलेचा ता.सहा एप्रिल रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सात दिवसांनंतर तिचे पुन्हा नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या नमुन्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे.

रुग्णालयात दाखल झाल्यापासून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. सध्याही तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ.राठोड यांनी सांगितले आहे. रुग्णाचे सात, दहा आणि चौदा दिवसांनंतर नमुने तपासून पाहिले जातात. 

जिल्ह्यातील ७८ संशयितांचे स्वॅब पडताळणीसाठी 

जालना जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण ५५८ व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात ८६ व्यक्ती भरती आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वी निगेटीव्ह आलेल्या ७८ संशयितांचे नमुने पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 

कोरोना संशयित म्हणून आतापर्यंत एकुण ४४५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकाच अहवाल ता.६ एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आला. तर ४२९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. कोरोना बाधीत रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या दाखल असलेल्या ११ रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहेत. गुरुवारी अलगीकरण कक्षातुन १७ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT