infants
infants infants
मराठवाडा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६५६ बाळांचा सुरक्षित जन्म

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सास्तुरच्या (ता. लोहारा) स्पर्श ग्रामीण रुग्णालय सामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या विविध आजारांवरील उपचारासाठी मोठा आधार ठरले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारी रुग्णालयात नॉन कोविड उपचार व सुविधा बंद झाल्याने विशेषतः महिलांच्या प्रसूती व सिझेरियनसाठी स्पर्श रुग्णालयाचा आधार महत्त्वपूर्ण ठरला. अडीच महिन्यांच्या काळात ६५६ महिलांची प्रसूती (बाळंतपण) करण्यात आले असून, त्यातील १९४ सिझेरियन करण्यात आले.

उमरगा शहरातील शंभर खाटांचे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणीसाठी दररोज गर्दी असायची. मात्र,रुग्णालयाचे रूपांतर कोविड रूग्णालयात झाल्याने अनेक रुग्णांना ताप, सर्दी व खोकल्याच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागले. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने नॉन- कोविडसाठी सुविधा सुरू करणे गरजेचे आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने नॉन- कोविड सुविधेच्या परवानगीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उमरगा, लोहारा तालुक्यातील बहुतांश सरकारी रुग्णालयाची बाह्य व अंतर रुग्णसेवा बंद असल्याने ‘स्पर्श’च्या मायेच्या हाताने अनेकांना धीर दिला. एक एप्रिल ते १५ जूनपर्यंत ६५६ मातांनी बाळाला जन्म दिला. त्यातील १९४ सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या. गरोदर काळात ३५ महिला कोरोना बाधित आढळल्या. त्यातील नऊ महिने पूर्ण झालेल्या सात महिलांची नॉर्मल प्रसूती झाली. त्यासाठी रुग्णालयाने स्वतंत्र कक्ष तयार केले आहे. रुग्णालयाची क्षमता ३५ खाटांचीच आहे, कमी कर्मचारी संख्या असताना प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांच्या नियोजनातून सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. दरम्यान, दोन महिन्याच्या काळात नऊ हजार ८२६ रुग्ण तपासणीला आले होते. ५८ महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया तर ५१ मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. पाच हजार ७५० कोरोना चाचण्या झाल्या. ८७५ एच.आय.यू. बाधित माता व मुलांना एक महिन्याचे किराणा साहित्य, उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातील कोविड सेंटर व केअर सेंटरमधील दोन हजार रुग्णांना चांगल्या प्रतीची औषधी किट्स देण्यात आल्या. तसेच १२४ गावांत मोबाईल युनिटद्वारे घरापर्यंत आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न स्पर्श रुग्णालयाने केला आहे.

सामान्य कुटुंबांपर्यंत आरोग्य सुविधा देण्याचा स्पर्श रुग्णालयाचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. खाटांची संख्या कमी असतानाही कोरोनाच्या काळात महिलांच्या बाळंतपणाची सोय सुरक्षित व्हावी, यासाठी डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे यशस्वी प्रयत्न झाले. कोरोना चाचणी, लसीकरणातही रुग्णालय सक्रिय आहे. बाधित रुग्णांपर्यंत चांगल्या दर्जाचे औषधी किट्स पोचवण्यात आले. स्पर्शचे आरोग्य सेवेचे व्रत असेच सुरू राहणार आहे.
रमाकांत जोशी, प्रकल्प अधिकारी, स्पर्श ग्रामीण रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT