file photo 
मराठवाडा

कोरोनाच्या सावटाने क्रीडांगणे ओस

सकाळ वृत्तसेवा

परभणी : उन्हाळा म्हटलं की, क्रीडा प्रशिक्षण शिबिरांची रेलचेल... परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावाचे सावट या शिबिरांवरदेखील पसरले असून येथील जिल्हा क्रीडा संकुलासह जिल्ह्यातील सर्व क्रीडांगणे ओस पडली आहेत.

शाळा, महाविद्यालयांच्या मार्च-एप्रिल महिन्यात परीक्षा होताच, विविध क्रीडा संघटना, संस्थांमार्फत विविध खेळांच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी जिल्ह्यात विविध खेळांची मोठ्या संख्येने प्रशिक्षण शिबिरे घेतली जात. सुट्यांमध्ये विरंगुळा व मनोरंजन व्हावे व त्यातून आपल्या पाल्यांने काहीतरी शिकावे या अपेक्षेने पालकांचादेखील या शिबिरांना आपल्या पाल्यांना पाठविण्याचा कल असतो. परंतु, जानेवारी महिन्यापासूनच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागला व सध्या तर राज्यात संचारबंदी लागू आहे. त्याचा फटका या क्रीडा प्रशिक्षण शिबिरांनादेखील बसला आहे. 
दरवर्षी जिल्हा क्रीडा संकुलातील सर्व क्रीडांगणावर सकाळ-सायंकाळ बालचिमुकल्यांसह युवक विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असे. क्रिकेट, जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्केटिंग, जिम्नॅस्टिक, मैदानी खेळ, बॉक्सिंग, कबड्डी हॉलीबॉल, ज्युडो, कराटे, तायकांदो, तलवारबाजी अशा अनेक नव्या तसेच पारंपरिक खेळांच्या शिबिरांचे आयोजन करण्यात येत असे. काही संस्था तर निवासी शिबिरे घेत. तालुक्याच्या ठिकाणीदेखील अशी शिबिरे होत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असे.

हेही वाचा - महिलांनी जागविल्या अंगभूत कला

विद्यार्थी अडकले घरांतच
परीक्षा संपण्यापूर्वीच कोरोना विषाणूच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा सुट्यांतील आनंददेखील हिरावून घेतलेला आहे. प्रशिक्षण शिबिरांना जाणे तर सोडाच, घराबाहेर पडण्यासदेखील आता मज्जाव होत असल्यामुळे विद्यार्थी घरातच अडकून पडलेले आहेत. ते आता घरात बसून ते टीव्ही, मोबाइल तसेच अन्य काही बैठे खेळ व छंदातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.


हेही वाचा - द्राक्ष उत्पादक अडचणीत
प्रशिक्षण शिबिरे खेळाडूंची टाकशाळा
क्रीडा प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून अनेक उदयोन्मुख खेळाडू घडत असतात. त्यातूनच भविष्यातील पदक विजेते खेळाडूदेखील निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्रीडा प्रशिक्षण शिबिरे ही एक प्रकारची टाकसाळच ठरतात. तर, खेळाडूंसाठी अशी शिबिरे कौशल्ये वाढविण्याची संधी देतात. अनेक शाळा, महाविद्यालयीन खेळाडू तर दिवाळी अथवा उन्हाळी सुट्यांची प्रतीक्षा करत असतात. जेणेकरून या सुट्यांमध्ये आपल्या ज्ञानात, कौशल्यात भर पडेल, अशी त्यांना अपेक्षा असते. म्हणून अशा उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांना मोठे महत्त्व आहे. परंतु, कोरोनाने या सर्वांच्या इच्छा, अपेक्षांवरदेखील पाणी फिरवलेले आहे. त्यामुळे क्रीडांगणेदेखील ओस पडलेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT