corona vaccine
corona vaccine 
मराठवाडा

Coronavirus: पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी 8 हजार 268 जणांची नोंदणी

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : वैद्यकीय सेवांशी संबधित शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांना पहिल्या टप्यात कोविड-19 ची लस दिली जाणार आहे. उस्मानाबाद जिल्हयाची तयारी पूर्णत्वास आली आहे. जिल्ह्याचा आरोग्य विभाग यासाठी तयारी करत असून यासाठी जिल्हा कृती दल स्थापन केले आहे.

कोविड-19 लसीकरणाबाबत साठवणूक करण्यासाठी जिल्हयात सद्यस्थितीत 57 शितसाखळी केंद्र आहेत. या 57 शितसाखळी केंद्रामध्ये 77 आयएलआर आहेत. या शितसाखळी केंद्रामध्ये 78 डिपफ्रिजर आहेत. 96 कोल्ड बॅाक्स उपलब्ध असून ही सर्व साधनसामग्री सुस्थितीत आहे. याशिवाय जिल्हयातील सर्व शितसाखळी केंद्रात एक हजार 748 व्हॅक्सिन कॅरिअर उपलब्ध आहेत. लसीकरणाची प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेप्रमाणे करण्यात येणार आहे.

पहिल्या दालनात लसीकरणासाठी आलेल्यासाठी प्रतिक्षा कक्ष असणार आहे. तेथे त्यांची ओळख पटवून नंतर त्यांना लसीकरण कक्षात पाठवले जाईल. लसीकरण झाल्यानंतर संबधितास तिसऱ्या कक्षात 30 मिनीटे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. 30 मिनीटांनी त्या कक्षातून त्यांना बाहेर पडता येणार आहे. लसीकरण केंद्रात प्रवेश करण्याचा मार्ग आणि लसीकरण झाल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा असणार आहे. शारीरीक अंतर आणि इतर सर्व खबरदारी घेऊन लसीकरण करण्यात येणार आहे.

प्रामुख्याने जिल्ह्यातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, आयुर्वेदिक रूग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय येथे लसीकरण केंद्र असतील.
कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी .

पोलिस, होमगार्ड, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक आदींची नेमणूक यासाठी केली जाणार आहे. को-विन ॲपवर नोंद केलेल्यानाच ठराविक दिवशी, ठरावीक वेळी लसीकरण केंद्रावर बोलविण्यात येणार असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात नियमित अधिकारी कर्मचारी संख्या एक 288 असून अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या 658 आहे. आशा सेविकांची संख्या एक हजार 207 असून आशा गटप्रवर्तकांची संख्या 66 आहे.

अंगणवाडी सेविका एक हजार 866 असून,अंगणवाडी मदतनीस एक हजार 648 आहेत. आरोग्य सेवा देणारे इतर बाह्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची संख्या 198 आहे. जिल्ह्यात शहरी भागात 768 तर ग्रामीण भागात 297 खासगी दवाखाने आहेत. को-विन ॲपवर आतापर्यंत आठ हजार 268 जणांनी जिल्ह्यातून नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT