Nanded Photo 
मराठवाडा

कोरोना : लॅब असूनही का होतोय ‘स्वॅब’ तपासणीला उशीर...?

शिवचरण वावळे

नांदेड : सुरुवातील मराठवाड्यात एकही कोरोना ‘स्वॅब’`तपासणीसाठी लॅब नसल्यामुळे कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवावे लागत होते. त्यामुळे स्वॅबचा आहवाल प्राप्त होण्यास दोन दिवसाचा कालावधी लागत असे. संशयित व्यक्तींच्या स्वॅब आहवालासाठी लागणारा विलंब कमी व्हावा यासाठी मराठवाड्यात औरंगाबाद आणि सोलापूर अशा दोन ठिकाणी ‘स्वॅब’ तपासणी लॅब सुरु करण्यात आल्या.

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातुन देखील या दोन्ही ठिकाणी स्वॅब तपासणीसाठी नमुने येत होती. त्यामुळे स्वॅब तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या टेस्ट किट्स आणि त्या मशिनवर येणारा ताण यामुळे कोरोना टेस्ट मशिन बंद पडणे, किट्सचा तुटवडा अशा संकटांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे जिल्ह्यातुन तपासणीसाठी  पाठविण्यात आलेले स्वॅब नमुने आहवाल दोन दिवसांनीच मिळत असल्याने, ‘पुणे’च बरे, असे म्हणायची वेळ आली आहे. 

‘लॅब’ असूनही चिंता कायम

पुणे, औरंगाबाद किंवा सोलापूर ही नको नांदेडलाच स्वतंत्र कोरोना चाचणी लॅब झाली पाहिजे असा आग्रह होता. यासाठी सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा कारुन अगदी काही दिवसात नागपूर विभागाकडून कोरोना चाचणी लॅबसाठी मंजुरी मिळवली. त्याला लागणारे बजेट देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी गाजावाजा करत सुसज्ज अशी ‘लॅब’ ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ परीसरात सुरु झाली. नांदेडला लॅब सुरु झाल्याने तरी, कोरोना संशयितां ‘स्वॅब’ची तात्काळ तपासणी होऊन लगेच आहवाल मिळेल असे वाटत होते. 

दोन दिवसापासून आहवाल प्रलंबित

लॅब सुरु झाल्याच्या पहिल्या दोन दिवसात या लॅबमध्ये शंभर पेक्षा अधिक संशयितांच्या घशातील लाळेचे स्वॅब तपासण्यात आले. त्यांचे रिपोर्ट देखील प्राप्त झाले आहेत. मात्र, त्यानंतर मागील दोन दिवसापासून लॅबमधुन एकही स्वॅब नमुना आहवाल प्राप्त झाला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पुन्हा ‘गड्या पुण्याचीच लॅब बरी होती’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. परिणामी नांदेड शहरात कोरोना चाचणी लॅब असूनही विलंब होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

आज संध्याकाळ पर्यंत आहवाल येण्याची शक्यता
जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सुरु झालेली कोरोना चाचणी ‘लॅब’ नवीन आहे. त्यामुळे पाठविलेले नमुने आहवाल मिळण्यास विलंब होत आहे. आज संध्याकाळपर्यंत अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.
- डॉ. निळकंठ भोसीकर (जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT