file photo 
मराठवाडा

कोरोनाचे सावट : न्यायदानाच्या वेळेत बदल 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यात कोरोनाची खबरदारी म्हणून न्यायालयानेही आपल्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. केवळ तीन तास न्यायदानाचे काम होणार असून अतीमहत्वाचे प्रकरणे असतील तर सुनावणीसाठी ठेवा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार कळविले आहे. 

सध्या संबंध जगात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. जगातील जवळपास १३५ देशात या आजाराने आपले हातपाय फैलावले आहेत. देशातही कोरोना मोठ्या प्रमाणात फैलावत असतांना प्रशासनाने काळजी म्हणून ३१ मार्चपर्यंत सर्व गर्दीचे ठिकाणी होणारे कार्यक्रम, शाळा, महाविद्यालय, चित्रपट, मॉल्स, जीम, व्यायाम शाळा, खासगी शिकवणी, आठवडी बाजार यासह आदी ठिकाणचे रद्द केले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालयानेही खबरदारी म्हणून न्यायदानाच्या वेळेत बदल केला आहे. दिवसातून फक्त तीन तास न्यायदान करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत कामकाज होणार आहे. 

राज्यात कोरोनाची धास्ती

देशासह राज्यात कोरोनाची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. राज्यातील पुणे, मुंबई या मोठ्या शहातील अनेकांना या आजाराची बाधा पोहचली आहे. त्याचा फैलाव होऊ नये म्हणून राज्य शासनाने खबरदारी घेऊन सर्वच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी काम नसेल तर जावु नये. तसेच कामानिमित्त घरातून बाहेर पडू नये आसे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांच्या सुचना

उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालय व संबंधीत जिल्ह्यातील सर्वच न्यायालयातही ग्रीद जमु नये यासाठी न्यायदानाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. अतीमहत्वाचा निकाल असेल तर ते अगोदर दोन ते तीन तासापूर्वी वकिलांनी न्यायालयाला कळवावे. किरकोळ प्रकरणात जास्त वेळ घालवु नका. त्यामुळे गर्दी जमा होणार नाही. याची खबरदारी म्हणून प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी तशा सुचना आपल्या सर्व न्यायीक अधिकारी यांना कळविले आहे. 

जिल्हा अभिवक्ता संघाचे प्रसिद्धीपत्रक 

तसेच जिल्हा अभिवक्ता संघाच्या वतीने सर्व सदस्यांना सुचना दिल्या असून सध्यस्थितीत न्यायालयाद्वारे केवळ तातडीच्या प्रकरणाचीच सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे तातडीने सुवणी हवी असलेल्या प्रकरणाची कल्पना संबंधीत पिठासन अधिकारी यांना सकाळई ११ वाजता द्यावी असे आवाहन जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. मिलींद लाठकर, उपाध्यक्ष ॲड. जगजीवन भेदे, सचीव ॲड. संजय मलदोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT