corona image.jpg 
मराठवाडा

Coronavirus : जालन्यात कोरोनाचा आठवा बळी, आणखी सात रूग्णांची वाढ

महेश गायकवाड

जालना : कोविड हॉस्‍पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या शहरातील शंकरनगर मधील 55 वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी (ता.12) सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अशी माहिती माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली. कोरोनाचा जिल्ह्यातील हा आठवा बळी असून जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 255 वर पोचली आहे.

अंबड शहरातील मदिना चौक परिसरातील 65 वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी (ता.11) मृत्यू झाला. त्याच दिवशी तब्बल 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोनाचा जिल्ह्यात उद्रेक झालेला आहे. तोच  शुक्रवारी शहरातील शंकरनगरातील रहिवाशी असलेला व मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील 55 वर्षीय व्यक्तींचा पहाटे मृत्यू झाला आहे.

 सदर रूग्णाला हृदयाचा आजार, उच्च रक्तदाब व न्यूमोनियाने ग्रस्त होता. ता.5 जून रोजी तो कोरोना बाधित आढळून आला होता. त्याची प्रकृती सुरूवातीपासून गंभीर होती. त्याच्यावर आयसीयु वार्डात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली.

सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
 दरम्यान जिल्ह्यात पुन्हा सात संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेल असून यामध्ये अंबड शहरातील नाईकवाडी मोहल्ला भागातील पाच, जालना शहरातील जयनगर येथील एक व राज्य राखीव दलातील एका जवानाचा समावेश आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधितांपैकी आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी वाढलेलया सात रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 255 झाली आहे असून त्यापैकी 145 रूग्ण बरे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT