latur news 
मराठवाडा

डोळ्यात तेल घालून पहारा देऊनही उदगीरात कोरोनाने खाते उघडले

युवराज धोतरे

उदगीर : शहरांमध्ये टाळेबंदी असताना डोळ्यामध्ये तेल घालून प्रशासनाने पहारा देऊनही कोरोनाने खाते उघडले आहे. गुजरातहुन आलेल्या एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहीती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यानी दिली आहे. यामुळे शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

लातूर जिल्हा कोरोनामुक्त झाला असतानाही बाहेरून येणाऱ्यांची संख्या दररोज सुरूच असल्याने हीच बाब उदगीरसाठी गंभीर ठरली आहे. एक सत्तर वर्षीय महिला उदगीर शहरातील चौबारा रोड परिसरात दाखल झाली होती. ती बाहेरून आली असे कळल्यानंतर प्रशासनाने तिला गुरुवारी (ता.23) दवाखान्यात नेऊन तपासणी केली व तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल शनिवारी (ता.25) प्राप्त झाला असून अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉ. ढगे यांनी सांगितले.

संबंधित महिलेवर दोन दिवसापासून येथील कोरोना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही महिला नेमके गुजरातीतून कशी आली. या महिलेच्या संपर्कात कोणकोण आले. याबाबत माहिती घेतली जात असून नेमका कोणता विभाग सील करायचे किंवा काय काय उपाययोजना करायच्या याबाबत प्रशासनाचे नियोजन सुरू आहे.

उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी तातडीने नगरपालिका पोलिस प्रशासन आरोग्य विभाग व महसूल विभागातील प्रमुख अधिकारी यांची बैठक बोलावली असुन हा संसर्ग जास्त प्रमाणामध्ये पसरू नये यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.

भुकंपासारखे उदगीर हादरले...

एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या बातमीने प्रशासनासह उदगीर शहर भूकंपासारखे हादरले. सगळीकडे धावपळ सुरू झाली असून ही अफवा  आहे की सत्यता यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे फोनचा अक्षरशा पाऊस पडला होता. एवढे दिवस डोळ्यात तेल घालून पहारा देऊन एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT