फोटो 
मराठवाडा

कोवीड-19 : वंचितकडून मोफत रुग्णवाहिका लोकार्पण 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना व्हायरस प्रादुर्भावाने उद्भवलेल्या लॉकडाऊन परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी नांदेड शहर आणि जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी एकजुटीने एकवटली आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब मजूरदारांना अन्नदान तसेच उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य वाटपाला मोठी गती देण्यात आली आहे. यापुढे जाऊन नांदेड शहर स्तरावर आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर अत्यावश्यक रुग्णांसाठी आजपासून विनामूल्य 'रुग्णावाहिका' सेवा लोकार्पन करण्यात आले आहे.

शनिवारी (ता. चार) वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद व वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांच्या पुढाकाराने तसेच नांदेडच्या तहजीब फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या सौजन्याने वंचितच्‍या या मोफत ऍम्ब्युलन्स सेवेची सुरुवात करण्यात आली. पूज्य भदंत पय्याबोधी आणि मौलाना अजीम रजवी सहाब यांच्या हस्ते मोफत ॲम्बुलन्स सेवेचे लोकार्पण करण्यात आले.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहन

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनानंतर नांदेड येथे वंचित बहुजन जिल्हा आघाडीतर्फे मदत कक्ष उभारण्यात आला आहे. नांदेड शहर, जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर लॉकडाऊन मध्ये सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यात येत आहे.

भोजन डबा पोहोचविण्यात येत आहे

नांदेड शहरात विविध ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे भोजन डबा पोहोचविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सकाळ संध्याकाळ दोन वेळा मोफत भोजनाची व्यवस्था पुरविण्यात आली आहे. लॉकडाऊन आदेशाला उणेपुरे दोन आठवड्यांचा कालावधी होत असल्याने नांदेड शहरात हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरी करणारे गोरगरीब, कामगार- कष्टकऱ्यांची मोठी बिकट अवस्था झाली आहे. 

अन्नधान्य पाकिटे घरपोच पुरवण्यात येत आहेत

बहुतेक झोपडपट्टी परिसरात मोठ्या संख्येने राहणाऱ्या गोरगरीबांच्या चुली बंद पडत आल्या आहेत. अशा गरजू लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अन्नधान्य पाकिटे घरपोच पुरवण्यात येत आहेत. ज्यामध्ये गहू- तांदूळ, डाळ, साखर , तेल आदी अत्यावशक वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय नांदेड शहरात विविध रस्त्यांवर वावरणाऱ्या बेवारस व भिक्षेकरी यांच्यासाठीसुद्धा खिचडी तसेच पाणी वाटपावर वंचित आघाडी तर्फे भर देण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद, जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आयुब खान, उपाध्यक्ष अशोक कापशीकर, कनिष्क सोनसळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष संदीप वन्ने, उन्मेश ढवळे, सचिन नवघडे, सोपान वाघमारे, गणेश सूर्यवंशी आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT