corona
corona corona
मराठवाडा

Corona Updates: मराठवाड्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात सोमवारी (ता. पाच) २६० कोरोनाग्रस्तांची भर पडली. सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकूण बाधितांपैकी १९५ बाधित हे बीड आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांतील आहेत. उर्वरित ६५ रुग्ण इतर पाच जिल्ह्यांतील आहेत. जालना जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात ३८ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील १६ तर ग्रामीणमधील २२ जण आहेत. दिवसभरात ६८ जणांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ४६ हजार ४३७ झाली आहे. त्यापैकी तीन हजार ४४२ जणांचा मृत्यू झाला. एकूण ५०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ४९५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

नांदेडमध्ये मृत्यू नाही
नांदेड जिल्ह्यात सोमवारी तीन रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ९१ हजार २७७ असून, आणखी १७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ८८ हजार ६९७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ७९ जणांवर उपचार सुरू आहेत. एकही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या एक हजार ९०६ आहे.

लातूर जिल्ह्यात १७ बाधित
लातूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे १७ रुग्ण आले आहेत. दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९० हजार ६४७ झाली आहे. जिल्ह्यात रविवारी ४५३ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट झाल्या यात नऊ जण पॉझिटिव्ह आले. तसेच ८८८ जणांच्या ॲँटीजेन टेस्ट झाल्या यात आठ जण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार ६४७ जणांनी कोरोनाची लागण झाली आहे. यात ८८ हजार ७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत दोन हजार ४०४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या १७१ जणांवर उपचार सुरू आहेत.

परभणीत तीन रुग्ण
परभणी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. सोमवारी केवळ सहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. ५१ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५० हजार ९८३ लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ४९ हजार ४७९ लोकांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात १ हजार २८३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २२१ रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात सहा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही.

हिंगोलीत केवळ एकच बाधित
हिंगोली जिल्ह्यात केवळ सोमवारी एकच रुग्ण आढळून आला तर एक रुग्ण बरा झाला. कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १५ हजार ९५१ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १५ हजार ५४५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आजघडीला एकूण २२ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आतापर्यंत ३८४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जालन्याला दिलासा
जालना जिल्ह्यात सोमवारी एकाही नवीन रुग्णाची आणि मृत्यूची नोंद झाली नाही. १४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत ६१ हजार २४८ कोरोनाबाधितांपैकी ५९ हजार ९५९ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे एक हजार १६८ जणांचा जीव गेले आहेत. सध्या जिल्ह्यात १२१ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बीड-उस्मानाबादमध्ये ७५ टक्के रुग्ण
बीड जिल्ह्यात १०४ नवे रुग्ण तर दोन मृत्यू नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातही कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला तर ९१ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोन जिल्ह्यांची एकूण रुग्णसंख्या १९५ आहेत. मराठवाड्यात सोमवारी आढळलेल्या रुग्णांचा विचार केला तर या दोनच जिल्ह्यातील ७५ टक्के रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT