मराठवाडा

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर (जि.औरंगाबाद ) ः निवडणूक कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.18) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस. एम. मुंगीकर असे कामचुकार अधिकाऱ्याचे नाव आहे. शाखा अभियंता मुंगीकर (जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग) यांची स्थिर पथकप्रमुख म्हणून महालगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियुक्ती केली होती.

मात्र, या वेळेत हा अधिकारी विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी मंडळ अधिकारी सोमनाथ तोतला, विभाग वैजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT