Crime News
Crime News  esakal
मराठवाडा

Crime News : भरदिवसा घरफोडी! सात तोळे सोने अन् रोख रकमेसह चोरटे लंपास

सुधीर कोरे

धाराशिव: विलासपूर पांढरी व माळेगांव (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करीत सात तोळे सोने व रोख पंचवीस हजार असे एकूण जवळपास सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी (ता.१६) दुपारी दोन च्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व नागरिकांनी चोरांना पकडण्यासाठी परिसर पिंजून काढला. परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.

या परिसरात वारंवार चोरीचे प्रकार घडत असून या दिवसा घरपोडीच्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांना पकडण्याचा पोलिसा पुढे एक आव्हान निर्माण झाले आहे.

विलासपूर पांढरी (ता. लोहार) येथील शिवाजी ज्ञानदेव मुळे हे बुधवारी (ता.१६) कुटुंबासह कौटुंबिक कार्यक्रमासाठी दूपारी बाहेर गेले होते. घर कुलूप बंद पाहून दुपारी एक ते दोन या काळात चोरट्याने घराचे कुलूप व घरातील कपाटाचे लॉकर कटरने तोडून कपाटातील सोन्याचे पाटल्या, अंगठ्या, गळ्यातील चैन, झुमके असे एकूण सात तोळे सोन्याचे अलंकार एकूण अंदाजे सव्वापाच लाखाचा (आताचा चालू बाजार भाव) मुद्देमाल लंपास केला आहे.

शिवाजी मुळे हे दुपारी दोनला घरी आले असता हा चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. यानंतर या चोरट्यांनी येथून दोन किमी वर असलेल्या माळेगाव (ता. लोहार) येथे गेले, येथील मंदिर सप्ताह चालू असल्याने गावातील बहुतांश नागरिक मंदिरात एकत्र आल्याचे फायदा घेत चोरट्यांनी व्यंकट कोंडीबा मोसंडे यांचे कुलुप बंद घर फोडून रोख २५ हजार व अर्धा तोळ सोनं असे एकूण ६२ हजाराचा मुद्देमाल लंपास केले.

याचवेळी या घरातून हे चोरटे बाहेर पडत असताना एका नागरिकांनी पाहून आरडा- ओरड केली. चोरटे आपल्या मोटार सायकलवर बसून ताबडतोब पसार झाले. येथील नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवून दहा-बारा मोटार सायकल वरून पाठलाग करीत चोरट्यांचा शोध घेतला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही परिसरात परिसर पिंजून काढला परंतु चोरटे पळवून जाणार यशस्वी झाले. हे चोरटे तीघे होते एकाच मोटरसायकलून आले होते. एकाने हेल्मेट घातला होता व दोघे तोंडाला स्कार्फ बांधला होता. गावातील सीसीटीव्ही कॅमेरात हे चोरटे कैद झाले असल्याची माहिती माळेगावचे सरपंच वैभव पवार यांनी दिले.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अजय चिंतले व उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. ठसे तज्ञ व श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. या घटनेची पुढील तपासणी फोजदार सुरेश नरवटे हे करीत आहेत. या परिसरात वारंवार चोरीचे प्रकार घडत असून आता या दिवसा घरपोडीच्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे एक आव्हान निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT