raid esakal
मराठवाडा

Crime News Latur : लातूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई ; घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा

संशयित महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा

लातूर : येथील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरात देहविक्रय व्यवसाय होत असल्याचे कळताच पोलिसांनी छापा टाकून एका महिलेस अटक केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

येथील एक महिला आमिष दाखवून अन्य गावांहून महिलांना बोलावून घेत होती. त्यांच्याकडून देहविक्रीय व्यवसाय करून घेत होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिस नियंत्रण कक्षाचे निरीक्षक शिरसाठ, उपनिरीक्षक श्यामल देशमुख यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली व घरावर छापा टाकला. यावेळी देहविक्रय करीत असताना दोन पीडित महिला व वेश्याव्यवसाय करून घेणारी एक महिला आढळली.

त्यांच्याकडून मोबाइल, रोख रक्कम असा एकूण १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित महिला स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर गावाच्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेते. काही रक्कम देऊन आमची खाण्यापिण्यासह राहण्याची व्यवस्था करते, असे पीडित महिलांनी पोलिसांना सांगितले.

त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयित महिलेस अटक केली. पोलिस निरीक्षक शिरसाट, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या श्यामल देशमुख, सदानंद योगी, सुधामती वंगे, लता गिरी, वाहनचालक बुड्डे यांनी या कारवाईत भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT