parali parali dev.jpg 
मराठवाडा

आठ महिन्यांची प्रतीक्षा संपली, परळीत प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांचा मेळावा! 

प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड) :  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून तब्बल आठ महिने बंद करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याने दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी (ता.१६) उघडण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.


मार्च महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे देशातील सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या वतीने व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालय व प्रार्थना स्थळेच आणखी उघडण्यात आली नव्हती. यामुळे धार्मिक स्थळे असलेल्या परिसरातील दुकानदारावर उपासमारीची वेळ आली होती. यासाठी विविध राजकीय पक्षांनी धार्मिक स्थळे उघडावीत म्हणून आंदोलने केली. अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळीच्या पाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.१६) सर्व धर्मीय धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांसह मंदिर परिसरात असलेल्या दुकानदारांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच रविवारी प्रभू वैद्यनाथाचे मंदिराचे प्रवेश द्वार उघडून साफसफाई करण्यात आली. भाविकांसाठी रांगेची व्यवस्था करण्यात आली.

काय म्हणतात लोक... 


यासंदर्भात शिवभक्त लक्ष्मण भोयटे यांनी सांगितले की, आम्ही नेहमी दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिरात जात असतो. पण आठ महिन्यांपासून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन होत नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरे उघडावीत म्हणून आम्ही प्रार्थना करत होतो. सोमवारी मंदिरे उघडण्यात आल्याने आनंद झाला आहे.


वैद्यनाथ मंदिर परिसरातील दुकानदार श्री. गडेकर यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने आमचे दुकानेही बंद होती. अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. पण आता मंदिरे सुरू झाल्याने आनंद होत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Female Doctor: साताऱ्यातील महिला डॉक्टरची आणि पोलिसाची ओळख कशी झाली? गुन्ह्यातील 'तो' दुसरा आरोपी कोण? मोठी माहिती समोर

Jr Hockey World Cup: पाकिस्तानची आशिया कपपाठोपाठ भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधूनही माघार! बदली संघाची होणार घोषणा

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात बंद; सेन्सेक्स 340 अंकांनी खाली, कोणते शेअर्स घसरले?

सायली-अर्जुनापेक्षा हटके आहे Reel Life सासूची खरी लव्हस्टोरी ! वर्षभर पाहिलेली होकाराची वाट

'महागठबंधन'मध्ये मुकेश साहनींना उपमुख्यमंत्रीपद देण्यामागं नेमकं कारण काय? काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला वगळून साहनींवर का विश्वास ठेवला?

SCROLL FOR NEXT