file photo 
मराठवाडा

बॅंकेत खातेदारांची झुंबड!

सकाळ वृत्तसेवा

परभणी :  संचारबंदीत ढिल मिळताच ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरत असून बँकांचा समोरील परिस्थिती अतिशय भयावह आहे. प्रतिबंधक उपाय योजनांची खिल्ली उडवल्या जात असल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर कोरोना संसर्ग पसरण्याचा अधिक धोका असून आता प्रशासनालाच या बाबीची गंभीर दखल घेणे गरजेचे झाले आहे.

शिवाजी चौक येथील बडोदा बँकेसमोर मंगळवारी (ता.सात) बँक उघडण्यापूर्वी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. जिथे जागा दिसेल तिथे नागरिक उभे होते. त्यामध्ये महिलांचेच प्रमाण लक्षणीय होते. रांगांमध्ये फक्त महिलाच कशा पुरुष का नाहीत? हे समजण्यास मार्ग नव्हता. कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांची याठिकाणी खिल्ली उडवण्याचा चित्र होतं चित्र होते. काही पोलिस कर्मचारी, नागरिक गर्दी विरळ करण्याचा प्रयत्न करीत होते.  परंतु त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.


संसर्गाला निमंत्रण ठरु शकते
 सुरक्षीत अंतर (सोशल डिस्टन्स), कलम १४४  तर कधीच पायदळी तोडण्यात आले होते. वैयक्तिक खबरदारीचा तर लवलेशही दिसून येत नव्हता. हे फक्त प्रतिनिधीक चित्र असून अशीच परिस्थिती विविध बँकांसह अन्य ठिकाणी होताना देखील दिसून येत आहे. शेकडोंच्या संख्येने नागरिक एकत्र येत असून शहरात संचारबंदी आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परभणी शहरात सकाळच्या सत्रात संचारबंदीत ढिल देण्यात येते त्याचा गैरफायदा नागरिक घेत असल्याचे सर्वदूर चित्र आहे आहे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण नाही म्हणून  होणारा हा गाफीलपणा कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. भाजीपाला, खरेदीसाठीच दूध खरेदीसाठीचे केंद्र असो किंवा बँका असो सर्वत्र गर्दीचे असे चित्र असून त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजनांची खिल्ली उडवली जाते की काय असे चित्र आहे. याबाबत प्रशासनाला दखल देणे आता गरजेचे झाले आहे.

धोका वाढण्याची अधिक शक्यता
राज्यातील कोरोना बाधित रुग्ण आढळून न आलेल्या जिल्ह्यात परभणीचा समावेश आहे. परंतु अशीच गर्दीची परिस्थिती कायम राहिली तर धोका वाढण्याची अधिक शक्यता आहे .परभणी जिल्ह्यात अद्याप एकही कोरूना बाधित रुग्ण आढळून आला नाही हे येथील नागरिकांचे सुदैव तसेच प्रशासन घेत असलेल्या उपाय योजनांचे फलित असल्याचा फलित असल्याचा दिसून येतो पण नागरिकांचे सहकार्य देखील तेवढेच गरजेचे असून नागरिक सामाजिक भान राखत नसल्याचे चित्र आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT