हिंगोली : शहरातील सर्वदुर प्रसिद्ध असलेला दसरा महोत्सव कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी देखील साधेपणाने साजरा होत आहे. खाकीबाबा मठात गुरुवारी (ता.सात) आकाशवाणी या धार्मिक कार्यक्रमाने महोत्सवास कोरोनाचे नियम पाळत सुरुवात झाली आहे.  Dasara Festival In Hingoli
मराठवाडा

हिंगोलीत आकाशवाणी कार्यक्रमाने दसरा महोत्सवास सुरुवात

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरातील सर्वदुर प्रसिद्ध असलेला दसरा महोत्सव (Dasara Festival In Hingoli) कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी देखील साधेपणाने साजरा होत आहे. खाकीबाबा मठात गुरुवारी (ता.सात) आकाशवाणी या धार्मिक कार्यक्रमाने महोत्सवास कोरोनाचे नियम पाळत सुरुवात झाली आहे. हिंगोली (Hingoli) येथील दसरा म्हैसूरच्या दसऱ्यानंतर प्रसिद्ध मानला जातो. या दसरा महोत्सवाचे १६७ वे वर्ष आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी जे ठिकाणी रामलीला मैदान या नावाने ओळखले जाते येथे साजरा केला जात होता. येथे रामलीला तसेच औद्योगिक प्रदर्शनी उभारण्यात येत होती. मात्र या ठिकाणी आता उद्यान उभारण्यात आले आहे. तसेच मागच्या वर्षीपासून कोरोनामुळे रामलीला मैदानावर भरणारा दसरा शहरातील कयाधु नदीच्या काठावर असलेल्या खाकी बाबा मठात सुरू करण्यात आला आहे.

या वर्षी देखील कोरोनाच्या सावटाखाली खाकीबाबा मठात कोरोना नियमाचे पालन करीत दसरा महोत्सव सुरू झाला आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजता सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने आकाशवाणीचा धार्मिक कार्यक्रम व विधीवत पुजा आर्चा करून करण्यात आला. यावेळी महंत कौशल्य दास महाराज, विश्वासराव नायक, गणेश शाहु, श्री. गोळेगावकर, गोविंद सारस्वत, दौलत बनसोडे, गोविंद गिरी, आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave: काळजी घ्या! राज्यात उन्हाचा तडाखा... अकोल्यात ४६.९ अंशांची नोंद, २२ शहरांत ४० पार!

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे प्रवाशांसाठी खुशखबर! मिसिंग लिंकचे महाराष्ट्रदिनी होणार उद्‍घाटन; खंडाळा घाटातील रखडपट्टी टळणार!

रुग्णालयातील नोंदीत धक्कादायक प्रकार! प्रसूतीवेळी आधारकार्डशिवाय नोंदविले महिलांचे अंदाजे वय; बालमाता शोधण्यासाठी डॉक्टरांची 7 पथके, वाचा...

मोठी बातमी! 355 कार्यालयांमधील सरकारी नोकरदारांनाही ‘ई-केवायसी’चे बंधन; कागदी पगारबिले यापुढे बंद; GR मध्ये जेवढी पदे तेवढ्यांनाच पगार, वाचा...

Panchang 27 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहु काळ, आजचा दिवस शुभ की अशुभ जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT