corona 
मराठवाडा

जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘या’ निर्णयामुळे हिंगोलीकरांना काहीसा दिलासा...

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः जिल्‍ह्यात बुधवारपासून (ता.१५) एक दिवसाआड किराणा, भाजीपाला तसेच कृषी केंद्र सुरू राहणार आहेत. यापुर्वी पाच दिवसाआड शहरात हे सर्व व्यवहार सुरू होते. आता ते एक दिवसाआड सुरू राहणार असल्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

जिल्‍ह्यात संचारबंदी, लॉकडाऊन सुरू असल्याने तसेच एक पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याने यापुर्वी एक दिवसाआड मिळणारा भाजीपाला पाच दिवसाआड करण्यात आला होता. त्‍याबरोबरच किराणा दुकाने देखील पाच दिवसाआड सुरू होती. यात केवळ औषधी दुकाने दररोज सकाळी नऊ ते एक यावेळात सुरू होती. आता मात्र हा निर्णय बदलून एक दिवसाआड किराणा व भाजीपाला सकाळी नऊ ते एक या वेळात सुरू राहणार आहेत.

परवानाधारक कृषी केंद्र राहणार सुरू
खरीप हंगाम जवळ येत आहे व व्यापाऱ्यांना खते व बियाणे साठा करणे तसेच शेतीसाठी उपयोगी महत्‍वाचे साहित्य जसे की ड्रीप, स्‍प्रिंकलर, पाईप पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे. ही सर्व दुकाने व जिल्‍ह्यातील परवानाधारक कृषी केंद्र आवश्यक असल्याने त्यासाठी एक दिवसाआड ही दुकाने सुरू राहणार आहेत. त्‍याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. बुधवार (ता.१५), शुक्रवार (ता.१७), रविवार (ता.१९), मंगळवार (ता.२१) गुरूवार (ता.२३), शनिवार (ता.२५), सोमवार (ता.२७), बुधवार (ता.२९) या दिवशी सकाळी नऊ ते एक या वेळात सुरू राहणार आहेत.

सण, उत्‍सव, आंदोलने पुढील आदेशापर्यंत बंद
तसेच सुरक्षिततेचा उपाय म्‍हणून चित्रपटगृह, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह, मंगलकार्यालय हे पुढील आदेश येईपर्यत बंदच राहणार आहेत. तसेच संचारबंदी गुरूवारपर्यंत (ता.30) एप्रिलपर्यत कायम राहणार आहे. जिल्‍ह्यातील कोणत्याही नागरिकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेर जिल्‍ह्यात जाण्यास मनाई आहे. तसेच बाहेरच्या कुणालाही येण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, येथून आलेल्यांना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. संचारबंदीत यापुर्वी प्रमाणेच सण, उत्‍सव, आंदोलने धार्मिक कार्यक्रम, आदींचे आयोजन करता येणार नाही.

मॉल, शाळा, उद्याने, महाविद्यालय, क्रीडांगणे बंदच राहणार
तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वाना संचारबंदीचे सर्व नियम लागून राहणार आहेत. जिल्‍ह्यातील खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्रित येत असतील अशा सर्व दुकानसेवा, अस्‍थापना, उपहारगृह, खानावळ, मॉल, शाळा, उद्याने, महाविद्यालय, क्रीडांगण, शिकवणी वर्ग प्रार्थनास्‍थळे (ता.३०) एप्रिलपर्यत बंदच राहणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic News : प्रवासाला निघालात? थांबा! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण ट्राफिक, सातारा-पुणे मार्गावरील खंबाटकी घाटातील स्थिती काय?

Gajkesari Yog Lucky Rashi 2026: नवीन वर्षात ‘या’ राशींचे नशीब पलटणार, 'गजकेसरी राजयोग' देणार मोठं यश

Mumbai News: कबुतरांना दाणे खायला घालणे पडले महागात, मुंबईतील व्यावसायिकावर कोर्टाची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Akola Municipal Election : भाजपच्या जागावाटपावर राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थता? अमोल मिटकरींचं भाजपला थेट आव्हान...

SCROLL FOR NEXT