मराठवाडा

उजनीच्या पाण्यासाठी पाठपुरावा सुरु

हरी तुगावकर

लातूर : लातूरला या वर्षा पुन्हा एकदा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्तची कामेही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पण लातूरला उजनी धरणातून पाणी मिळावे या
करीता पाठपुरावा सुरुच आहे, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

रेल्वे बोगी कारखान्याचा प्रारंभ शुक्रवारी (ता. 12) निलंगेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. पावसाअभावी यावर्षी पुन्हा एकदा लातूरला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवाराची मोठ्या प्रमाणात कामेही सुरु करण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षापासून आपण मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे लातूरला उजनी धरणातून पाणी द्यावे या करीता पाठपुरावा करीत आहे. या
धरणातून उस्मानाबादपर्यंत पाणी येत आहे. पण त्यात शेअरिंग करणे अडचणीचे आहे. न्यायालयीन अडचणी आहेत. यावर मात करून उजनी धरणातून कर्नाटकात वाहून जाणारे पाणी लातूरला मिळावे या करीता आपण यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. हे पाणी आले तर लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच औद्योगिक क्षेत्राचा पाण्याचा प्रश्न मिटेल, असे मतही निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

उद्योजकांनो निश्चिंत रहा
मांजरा धऱणातून येथील एमआयडीसीला पाणी पुरवठा होत आहे. पण दोन
दिवसापूर्वी हा पाणी पुरवठा तोडण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांवर पाणी
संकट आले आहे. अचानक पाणी पुरवठा तोडणे चुकीचे आहे. या संदर्भात पूर्व
बैठकही झाली नाही. किमान पुढील दोन महिने तरी या उद्योगांना रिलिफ देण्यात येणार आहे. त्यानंतर पाणी कपातीचे धोरण अंवलंबले जाईल.
उद्योजकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. उद्योजकांनी निश्चिंत रहावे.
उद्योगासोबतच नागरीकांनी देखील पाण्याचा  काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन श्री. निलंगेकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT