Beed News 
मराठवाडा

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण न घालता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

प्रा. प्रविण फुटके

परळी (बीड) : कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. त्यावर उपाय योजनांसाठी राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. यात आपलाही खारीचा वाटा म्हणून आईच्या गोड जेवणाच्या, उत्तरक्रियेच्या कार्यक्रमाची रक्कम त्यांनी कोरोनाशी लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन एक नवा आदर्श निर्माण केला. 

परळी येथील इंदूबाई भास्करराव जोशी यांचे ता. दोन एप्रिलला निधन झाले. त्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत जोशी यांच्या आई होत्या. पुर्वी मुंडे यांचे प्रसिद्धीप्रमुख आणि आता मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून प्रशांत जोशी यांचा विविध घटकांत राबता आहे. त्यामुळे त्यांची आई गेल्याचे कळताच त्यांच्या सांत्वनासाठी काही ना काही पर्याय शोधून लोक येऊ लागले.

प्रशांत जोशी यांनी फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांद्वारे ‘माझ्या आभाळाएवढ्या दु:खात आपण सर्व सहभागी आहातच. परंतु, माझ्या दु:खापेक्षा कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे भेटून सांत्वन करायला येऊ नका. माझ्या आईच्या आत्मत्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा,’ अशी पोस्ट लिहिली. कोरोनाच्या लढ्यात जातीने लक्ष घालून असलेले पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मदतीसाठी त्यांनी लगेच ‘बॅक टु वर्क’ अशीही भूमिका घेत घरुन पूर्णवेळ कामही सुरू केले. 

दरम्यान, आता इंदूबाई जोशी यांचा गोड जेवणाचा, उत्तरक्रियेचा कार्यक्रमही लॉकडाऊनमुळे कौटुंबिक पद्धतीनेच नैवेद्य दाखवून उरकून घेतला. त्यानंतर याची २५ हजार रुपयांची रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. प्रशांत जोशी यांनी पाडलेला हा नवा पायंडा समाजापुढे एक आदर्श ठरल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: बिकेसीमधील MCAच्या क्लबवर FDAची कारवाई, रेस्टॉरंट तात्पुरते बंद

IND vs SL: शुभमन गिल सचिन, सेहवागच्या रांगेत बसला! कपिल देव यांचा रेकॉर्ड अवघ्या ७ दिवसांनी मोडला

Ashok Shirsat MPSC Success: शेतहमालाच्या मुलाची एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून राज्य कर निरीक्षक पदासाठी गवसणी ;आरंणगाव येथील ग्रामस्थांकडून मिळालेल्या यशाबद्दल अशोक शिरसाटचा सत्कार

Marathi News Live Updates : कावेरीचे पाणी सोडल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची कर्नाटक सरकारवर जोरदार टीका

Dhuloba Ramling Devasthan : कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला; भाविकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT