file photo 
मराठवाडा

( Video )- हिंगोलीत पहिल्यांदाच कोरोना बाधीत रुग्णावर यशस्वी डायलिसिस

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील औंढा रोडवरील जिल्हा कोरोना रुग्णालयात कोरोना बाधित रूग्णाचे जिल्ह्यातले पहिले डायलिसिस यशस्वीरीत्या करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ६७६ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले आहेत.  जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असून जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागाकडून डायलिसिस विविध उपाय योजना केल्या जात आहेत. जिल्हा रूग्णालय  येथे डायलिसिस विभाग २०१४ पासून स्थापन असून आजपर्यंत जिल्ह्यातील रूग्णालायात एकुण ११ हजार ६७६ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले. विशेष म्हणजे नियमित डायलिसिस रूग्णापैकी एक रूग्ण कोरोना असल्याचे गुरुवारी (ता. एक)  आढळून आला. रुग्णाला उच्च रक्तदाब असून दोन्ही किडनी निकाम्या झाल्या आहेत.

रुग्णाचे डायलिसिस आठवड्यातून दोन वेळेस करणे गरजेचे

कोरोना रुग्णास अँनेमिया सोबतच कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णाचे डायलिसिस आठवड्यातून दोन वेळेस करणे गरजेचे आहे. शुक्रवारी (ता. दोन) औंढा रोड येथे नवीन स्थापन केलेल्या सुसज्ज डायलिसिस विभागात डायलिसिस मशीन, आर.ओ.प्लान्ट, ऑक्सीजन, फॉरवर्ड बेड तसेच अत्यावश्यक सेवा सुविधा, जनरेटर सर्व कार्यान्वीत करून गुरुवारी जिल्ह्यात प्रथमच कोरोना बाधीत डायलिसिस रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले

रुग्णाची प्रकृती सुधारत असून रूग्ण व नातेवाईकांनी डायलेसिस विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. डायलिसिस उपचारासाठी डायलिसिस विभागातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम आऊलवार, डायलिसिस वैज्ञानिक अधिकारी एजाज पठाण, संतोष गिरी, अधिपरिचारिका आदींनी परिश्रम घेतले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT