NND13KJP01.jpg 
मराठवाडा

भाजीपाला, फळांची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने उत्पादीत मालाची विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच व्यापारीही मालाची खरेदी करण्यासाठी पुढे येत नाहीत. या परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे काम  अव्याहतपणे कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

जिल्हास्तरीय कार्यक्रम गटाची स्थापना
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसंचालक(आत्मा) एम. के. सोनटक्के, तंत्र अधिकारी एस. एस. स्वामी, श्रीहरी बिरादार यांच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमगट स्थापन केला आहे. जिल्ह्यातील भाजीपाला फळे उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून रीतसर वाहतूक परवाना मिळवून देणे, फळे-भाजीपाला मागणीची नोंद घेणे, क्षेत्रीय स्तरावरील अडचणी सोडविणे, वाहतूक आढावा घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांना विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, तालुका, जिल्हा, नगरपालिका, महानगरपालिका या जिल्ह्यांतर्गत मागणीसह राज्यातील इतर जिल्ह्यात व इतर राज्यात मागणीप्रमाणे फळे भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

दररोज शंभर ते दिडशे क्विंटल मालाची विक्री
जिल्ह्यात या माध्यमातून दररोज ९० ते शंभर क्विंटल भाजीपाला तर १५० क्विंटल टरबूज व इतर फळांची विक्री शेतकरी ते ग्राहक थेट करण्यात येत असून संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात अशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, बिलोली, भोकर, कंधार, नायगाव, देगलूर, नांदेड, माहूर, किनवट. लोहा, मुखेड, मुदखेड यासह सर्वच तालुक्यात भाजीपाला व फळांची विक्री होत आहे.
 
हेही वाचलेच पाहिजे.....शेतकऱ्यांच्या घरूनच होणार शेतमालाची खरेदी

स्थानिक स्तरासह परराज्यात विक्री
कंधार तालुक्यातील भाजीपाला, टरबूज इत्यादी फळांची जिल्ह्यात तसेच स्थानिक बाजारपेठेत विक्री करण्यात येत आहे. लवकरच रितसर परवानगी घेऊन परराज्यात विक्री करण्यात येणार आहे. बिलोली तालुक्यातील टरबूज विक्री स्थानिक बाजारपेठेसह अकोला जिल्ह्यातही करण्यात आली आहे. हदगाव येथेही स्थानिक बाजारपेठेसह अन्य ठिकाणी मागणीप्रमाणे  भाजीपाला व फळांची विक्री होत असून नांदेड तालुक्यात गुरुद्वारात लंगरसह सोसायटीमध्ये भाजीपाला व इतर फळे विक्री करण्यात येत आहेत. देगलूर व भोकर तालुक्यातही गरजेप्रमाणे भाजीपाला, फळे विक्री करण्यात येत असून या कामी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. 

तालुका ते ग्रामस्तरवर साखळी
तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, मंडळ स्तरावर मंडळ कृषी अधिकारी तर गावस्तरावर कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व कृषी मित्र या सगळ्यांच्या सहकार्याने ही साखळी तयार केली आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझरच्या वापरासह संपूर्ण काळजी घेत येत्या काळात कुठल्याही प्रकारचा भाजीपाला व फळे कमी पडणार नाहीत. त्याचप्रमाणे भाजीपाला आणि फळांची विक्री शेतकरी ग्राहक थेट होईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: आई कुठे आहे बाबा? वडिलांचं उत्तर ऐकून मुलं सुन्न झाली… "मी तुमच्या आईला मारले, तिला पुरून टाका"

Sunil Bagul : व्हिडिओ हटविण्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; बागूल यांची अटकपूर्व सुनावणी पुढे ढकलली

Latest Maharashtra News Updates : २ तासांच्या तणावानंतर अखेर मोर्चाला परवानगी; ठरलेल्या मार्गावरूनच निघाला मोर्चा

Nashik Citylink Bus : नाशिक सिटीलिंक बससेवेला ४ वर्षे पूर्ण; ८ कोटींहून अधिक प्रवासी, २४३ कोटींचा महसूल

Shravan Month 2025 Festivals List: श्रावण महिना- सणांचा थाट, आनंदाचा बहर, जाणून घ्या महत्त्व अन् श्रावण महिन्यात येणारे सण

SCROLL FOR NEXT