file photo 
मराठवाडा

भाजीपाला, फळांची जागेवरच नासाडी

कैलास चव्हाण

परभणी : लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने विक्रीअभावी फळे, भाजीपाला यांची मोठी नासाडी होत असून बहुतांष भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी भाजीपाला आहे, त्या अवस्थेत सोडून दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

लॉकडाउनमुळे सर्वत्र बंद आहे. केवळ फळे, भाजीपाला, दूध आणि जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य अस्थापना बंद आहेत. भाजीपाला विक्री सुरू असली तरी कोरोनाच्या भीतीमुळे विक्रीत मोठी घट झाली आहे. ग्राहक घराबाहेस पडण्याचे टाळत आहेत. तसेच व्यापारी आणि किरकोळ विक्रेतेदेखील नेहमीप्रमाणे भाजीपाला खरेदी करत नसल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादकांवर झाला आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून जिल्ह्यात अनेक तरुण शेतकऱ्यांनी भाजीपाला लावलेली आहे. तसेच स्थानीक बाजारपेठेत विकण्यासाठी फळांचीदेखील लागवड केली आहे. भाजीपाला आणि फळांची ग्राहक संख्या ही शहरात सर्वाधिक आहे. परंतु, शहरात भाजीपाला पोचविणे जिकिरीचे आणि धोक्याचे झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

 उठाव नसल्याने दर पडले
 शहराजवळचे शेतकरी शहरात जाऊन भाजीपाला विक्री करत असले तरी शहरापासून दूर असणारे गावातील शेतकऱ्यांना भाजीपाला काढून ते शहरापर्यंत नेताना अडचणी येत आहेत. भाजीपाला विक्रीसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत वेळ आहे. परंतु, भाजीपाला दररोज काढावा लागतो.त्यासाठी वेळ लागत आहे. त्यात वाहनेदेखील मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ठोक भाजीमार्केटमध्येही उठाव नसल्याने दर पडले आहेत. तसेच खरेदीदार व्यापारी अडून भाजीपाला घेत असल्याने काढणीचा खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजीपाला आहे त्या अवस्थेत सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भोसी (ता. जिंतूर) येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन होते. अंजिठ्यांच्या डोगंर रांगात वसलेल्या व कायम दुष्काळ असलेल्या भोसी गावातील शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करत आणि अल्पशा पाण्यावर भाजीपाला लागवड केलेली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला मोडण्याची वेळ आली आहे. दिलपसंद, टोमॅटो, शिमला मिरची आदी भाजीपाल्याची नासाडी सुरू झाली आहे.

हेही वाचा - ‘कोरोना’ला रोखण्यासाठी डॉक्टरची दुचाकीवरून जागृती


विक्रीअभावी भाजीपाला खराब
उधार-उसनवारी करत दोन महिन्यांपूर्वी २५ हजार रुपये खर्च करून दीड एकरवर दिलपसंदची लागवड केली आहे. तसेच ४० हजार रुपये खर्च करत अर्धा एकरावर टोमॅटो व अन्य भाजीपाला लागवड केला आहे. मात्र, विक्रीअभावी भाजीपाला जागेवरच खराब होत आहे. शासनाने सर्वेक्षण करून भाजीपाला उत्पादकांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
श्रीधर संपतराव ठोंबरे, शेतकरी, भोसी (ता.जिंतूर)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

WI vs ZIM, T20 WC: वेस्ट इंडिजचा विजय अन् टीम इंडिया स्पर्धेबाहेर? झिम्बाब्वेविरुद्धच्या निकालाने सर्व गणित बिघडले, आता फक्त आणि फक्त...

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT