2Sakal_20News_11
2Sakal_20News_11 
मराठवाडा

ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, मराठा महासंघाचा इशारा

उमेश वाघमारे

जालना : भरती प्रक्रियेवरून ओबीसी आणि मराठा समाजात राजकीय फायद्यासाठी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मराठा महासंघ गप्प बसणार नाही, असा इशारा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी दिला आहे. यावेळी श्री.देशमुख यांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की मंत्री विजय वडेट्टीवार व काही नेत्यांकडून ओबीसी प्रवर्गातील ज्या प्रवर्गाला आजवर काहीच लाभ मिळाला नाही. त्यांना लाभ मिळावा, अशी भूमिका मांडली आहे.

त्या भूमिकेचे स्वागत आहे. मात्र, त्यांना लाभ मिळाला नसल्याचे खापर एसईबीसीवर फोडण्याचा प्रयत्न करू नये. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात कोरोनामुळे आर्थिक अडचण असल्याने वैद्यकीय सोडून इतर कोणतीही भरती करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया जाहीर केल्या. आज शासनाचे आर्थिक गणित ढासळले आहे. अनुशेष व बिंदू नामावलीतील त्रुटी, सर्वोच्च न्यायालयातील पदोन्नती केसमधील त्रुटी व बाबींची पूर्तता केल्याशिवाय प्रवर्गनिहाय जागा कशा पद्धतीने निश्चित करणार आहात?

मग भरती कशी, कोणती व किती जागांची करणार आहात? भरतीमधील मराठा आरक्षणच्या जागा बाजूला ठेवण्याची तरतूद कोणत्या नियमात आहे? असे सवालही देशमुख यांनी उपस्थित केले आहेत. केवळ ओबीसी आणि मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी आणि त्याचा राजकीय फायदा उचलण्यासाठी अशा प्रकरचे व्यक्तव्य केले जात असल्याचा आरोपही मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे अशोक पडूळ, अ‍ॅड.शैलेश देशमुख, सुभाष चव्हाण, संतोष कराळे, विशाल ढगे आदींनी केला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

Yerwada Jail News : येरवडा कारागृहात कैद्यांकडून हवालदाराला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT