file photo 
मराठवाडा

नव्या वर्षाची सुरवात दंडाने

सकाळ वृत्तसेवा

परभणी : दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी २८ गुन्हे दाखल केले आहेत. या एकटया परभणी शहरात २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नव्या वर्षाची सुरवातच २८ जणांची दंडाने झाली आहे.

नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पाट्या व इतर ठिकाणी जावून दारू पिलेल्या तरूणांसह इतरांवर पोलिसांची ता. ३१ डिसेंबर रोजी करडी नजर होती. मंगळवारी सकाळपासूनच परभणी शहरात शहर वाहतुक शाखा व इतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या पार्ट्या, आतषबाजी करण्यात येते. त्यानुसार परभणी शहरात देखील अनेक तरुण मंडळी हा जल्लोष साजरा करण्यासाठी मंगळवारी रात्री घराबाहेर पडली होती. परंतु, दारू प्यायल्यानंतर वाहन चालवू नये, असे आवाहन यापूर्वीच परभणी पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. मात्र, त्याला न जुमानता अनेक तरुणांनी दारू पिल्यानंतर वाहने चालवली. त्याचा फटका त्यांना बसला आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वर मोठ्या प्रमाणात दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या तरुणांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मध्यरात्री पकडले. यामध्ये प्रामुख्याने जिंतूर रोड, गंगाखेड रोड, वसमत रोड, पाथरी रोड या भागासह शहरातील किंग कॉर्नर व ग्रँड कॉर्नर आदी भागात कारवाई करण्यात आली. परभणी शहरातील वाहतूक शाखेने २२ जणांवर दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर भागांमध्ये ६ गुन्हे दाखल झाले आहेत. यात परभणी शहरात शहर वाहतुक शाखेच्यावतीने २२, पूर्णा पोलिस ठाण्यात दोन, गंगाखेड मध्ये १, पालम १, सेलू १ व मानवत पोलिस ठाण्यात १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ही कारवाई सातत्याने होत राहणार

ता. ३१ डिसेंबर रोजी दिवसासह रात्री आम्ही विशेष मोहिम राबविली होती. परंतू, ही मोहिम आता शहरात कायमस्वरूपी राबविली जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपली वाहने जपून चालवावीत. सोबत वाहन परवाना ठेवावा.
- गजेंद्र सरोदे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाने पाकिस्तानला टपली मारली; ८ बाद २३५ वरून मॅच ४००+ पोहोचवली, शेजाऱ्यांची रडारड

Jaish-e-Mohammed : पाकिस्तानचा नवा डाव! महिलांसाठी 'जिहादी कोर्स'ची ऑनलाईन सुरुवात; प्रवेश फी फक्त 156 रुपये, कोर्समध्ये काय शिकवले जाणार?

Realme ने आणलाय सुपर Smartphone! बदलू शकता बॅक कॅमेरा, फीचर्स पाहून शॉक व्हाल अन् किंमत फक्त एवढीच...दिवाळीला खरेदी कराच

Diwali 2025: आज पाडवा आणि गोवर्धन पूजा, उद्या भाऊबीज; चुकवू नका महत्त्वाचे मुहूर्त

Latest Marathi News Live Update : शिर्डीला पावसानं झोडपलं, पावसामुळे भाविकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT