beed vihir batmi.jpg 
मराठवाडा

बीड : चालकाचा ताबा सुटला, अन् स्कॉर्पियो गेली पुढे...

सकाळवृत्तसेवा

कडा (बीड) : जालना येथे लग्न समारंभाचा कार्यक्रम उरकून गावी परतत असताना आष्टी तालुक्यातील देविनिमगाव परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल विहिरीत स्कॉर्पियो गाडी शुक्रवारी (ता.१२) रात्री ०९ वाजता कोसळली. गाडीतील तीन व्यक्ती या घटनेत जखमी झाले. त्यांना स्थानिक गावकऱ्यांनी कडा येथे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील नितीन अशोक गुंड, बालू शहादेव गुंड व करन राजू पवार हे तिघे मित्राच्या लग्नासाठी शुक्रवारी (ता.१२) जालना येथे गेले होते. लग्नाचा कार्यक्रम उरकून ते पाथर्डी कडा मार्गाने आपल्या गावी परतत असताना देविनिमगाव परिसरात गाडी आली.  अचानक गाडीची लाईट बंद पडल्याने वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. शेजारी असलेल्या पन्नास फूट खोल विहिरीत गाडी कोसळली. गाडीतील तिन्ही व्यक्ती जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी कडा येथे दाखल केले आहे.

महत्त्वाची बातमी
वीज अंगावर पडून सख्खे बहिणभाऊ जागीच ठार
वडवणी : आई वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहीण भावाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मोरवड येथे घडली आहे. काल तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची शेतात पेरणी व कापूस लागवड सुरू आहे.

आज मोरवड येथील विष्णू अंडील यांच्या शेतात कापूस लागवड सुरू होती. यामध्ये विष्णू अंडील यांचा मुलगा व मुलगी कामात मदत करत होते आज दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाल्याने आई वडील व हे दोघे बहीण भाऊ निवऱ्यासाठी झाडाच्या खाली थांबले होते. त्या झाडावर अचानक वीज कोसळल्याने अशोक विष्णू अंडील (वय 17 ) व पूजा विष्णू अंडील (वय 15 ) यांच्या होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मयत अशोक अंडील हा पुणे येथील फर्ग्युशन महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता तर मुलगी पूजा ही गावातीलच विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती.मुलगा कोरोनामुळे गावी आला होतो मात्र त्याच्यावर काळाने घाव घातल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT