जालना - चारा-पाण्याच्या अभावामुळे अनेक पशुपालकांवर शेळ्याही विकण्याची वेळ आली आहे. येथील बाजारात विक्रीसाठी शेळ्या नेताना.
जालना - चारा-पाण्याच्या अभावामुळे अनेक पशुपालकांवर शेळ्याही विकण्याची वेळ आली आहे. येथील बाजारात विक्रीसाठी शेळ्या नेताना. 
मराठवाडा

जॉबकार्ड हाय, काम मिळंना, घर चालंना, म्हणून गाव सोडलं

नितीन गायकवाड

जॉबकार्ड हाय, गावात काम मिळंना, सहा जणांचं घर चालवणं अवघड झालं, त्यामुळे गाव सोडून आडूळला (ता. पैठण) खडी केंद्राच्या दगड फोडण्याच्या कामासाठी आलो. दिवसभर काम करून दोघांत सातशे रुपये मजुरी मिळते. परवडत नसले तरी काम करण्याशिवाय पर्याय नाही. गावात काम मिळालं असतं तर इथं यायची वेळंच आली नसती, असे सांगताना दादाराव पवार यांनी ‘गरीब माणसाला काम मिळंना, सरकार काही करणारंय का?’, असा सवाल उपस्थित केला.

दादाराव नामदेव पवार (वय ३८) हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगावचे. सेनगाव हे तालुक्‍याचे ठिकाण असले तरी दुष्काळी स्थितीमुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दादाराव पवार यांच्यासह पाच जण सेनगावातून आडूळ परिसरातील खडी केंद्रासाठी दगड फोडण्याच्या कामावर आले आहेत. 

आठवड्यातून एकदा खर्चासाठी एक हजार रुपये उचल मिळतात, त्यातून स्वतःचा खर्च भागवून महिनाअखेर मिळालेल्या रकमेतून ते गावाकडे पैसे पाठवतात. पवार यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांकडेही जॉबकार्ड आहेत; मात्र रोजगार हमी योजनेतून कामे मिळत नसल्याने त्यांना स्वतःचे गाव सोडून आडूळ परिसरात यावे लागले आहे. शेती नाही, उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही, मजुरीचे मिळेल ते काम करण्याशिवाय पर्याय नाही. त्यात खरीप हंगामात पावसाअभावी पिके करपून गेली, रब्बीचा तर कोणी विचारही करत नाही. त्यामुळे शेतातील मजुरीची कामे मिळण्याची आशा मावळली आहे, पिण्याचे पाणी मिळणेही कठीण झाले आहे, अशा परिस्थितीत अनेक जण गाव सोडून काम मिळेल त्या ठिकाणी जात असल्याचे दादाराव पवार यांनी सांगितले. गावातच काम उपलब्ध करून द्यावे आणि किमान पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळावे, अशी सरकारकडून त्यांची माफक अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT