file photo
file photo 
मराठवाडा

‘कोरोना’मुळे ‘या’ जिल्‍ह्यात आपत्ती व्‍यवस्‍थापन कायदा लागू

अभय कुळकजाईकर

नांदेड - आंतरराष्ट्रीय स्‍तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणुबाधित रुग्‍ण आढळत आहेत. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरून आणि देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. त्‍यामुळे हा संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तत्‍काळ नियंत्रण करणे व विषाणूंची संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्‍यावर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. सदर संशयित रुग्‍णामुळे आपत्तीजनक परिस्थिती नांदेड जिल्‍ह्यात उद्भवू नये, यासाठी जिल्‍ह्यात आपत्ती व्‍यवस्‍थापन कायदा २००५ लागू झाल्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी निर्गमित केले आहेत.

पूर्वतयारी व प्रत्‍यक्ष अंमलबजावणीसाठी कोरोना आजाराचे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर (मोबाइल ९८९०१३०४६५) व जिल्हा परिषदेचे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे (मोबाइल ९९७००५४४०८) यांना संनियंत्रक म्‍हणून घोषित करण्‍यात आले आहे. त्‍यानुसार प्रत्‍येक विभागाने आपल्‍या अधिनस्‍त अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आदेश दिले आहेत.

अफवा पसरवणाऱ्यावर कार्यवाही
गृह विभागातील पोलिस अधीक्षक विभागाकडे परदेशातून आलेल्‍या नागरिकांची माहिती संकलित करावी. ज्‍या हॉटेलमध्‍ये व नातेवाइकांकडे नागरिक मुक्‍कामास आहेत किंवा कसे त्‍यांची माहिती एकत्रित करून जिल्‍हा रुग्‍णालयास कळवावी. कोरोना विषाणू संसर्गाबाबत सोशल मिडियाच्‍या माध्‍यमातून अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर सायबर सेल मार्फत योग्‍य ती कार्यवाही तसेच अफवांवर नियंत्रण ठेवावे. शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक यांना सदर कार्यक्रम आयोजित करू नये, अथवा परावृत्त करावे.

उपाययोजना सोबतच जनजागृतीही 
आरोग्‍य विभागातील नांदेड जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता कृती प्रमाणित कार्यपद्धती तयार करावी. कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्‍ह्यात वाढू नये यासाठी उपाययोजना आखण्‍यात यावी. महापालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्‍हा प्रशासन अधिकारी व नगरपालिका, नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी यांनी आपल्‍या अधिनस्‍त रुग्‍णालयांमार्फत जनजागृती करण्‍यात यावी. वार्डनिहाय स्‍वच्‍छता ठेवावी. केरकचरा साचणार नाही याची दक्षता घ्‍यावी. तसेच सार्वजनिक शौचालयांची स्‍वच्‍छता ठेवावी. कॉरटाईन व आयसोलेशन युनिट स्‍थापन करावे.

चुकीचे समज पसरवू नका
जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्‍यमिक यांनी आपल्‍या अधिनस्‍त प्राथमिक आरोग्‍य केंद्रांमार्फत जनजागृती करण्‍यात यावी. महसूल विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार यांनी तालुकास्‍तरावर सेवाभावी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून जनजागृती करावी. अन्‍न प्रशासन विभागाचे सहआयुक्‍त, अन्‍न व प्रशासन विभागाने औषध विक्रेते यांनी जास्‍त भावाने मास्‍क विक्री, औषधींची साठेबाजी, संसर्गाबाबत चुकीचे समज पसरविणे आदी बाबी निदर्शनास आल्‍यास तत्‍काळ आयसी यांना माहिती द्यावी व योग्‍य कार्यवाही करावी.

दैनंदिन अहवाल सादर करावा
सर्व विभागांनी जबाबदारीच्‍या अनुषंगाने वेळोवेळी आवश्‍यक ती कार्यवाही करावी व दैनंदिन अहवाल नांदेड जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक यांना सादर करावा.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्‍ह्यातील सर्व विभागांकडून प्राप्‍त होणाऱ्या दैनंदिन अहवालाची एकत्रित माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक यांनी जिल्‍हाधिकारी यांचे अवलोकनार्थ सादर करणार आहेत. तसेच सदर विषयांबाबत वेळोवेळी आवश्‍यकतेनुसार बैठकांचे आयोजन करून त्‍या बाबत संबंधितांना अवगत करावे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT