Money esakal
मराठवाडा

Maharashtra Rain: पावसाचा मोठा फटका, नोटा भिजल्याने चक्क 12 लाख पाण्यात

पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात १२ लाख पाण्यात गेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे अतोनात नुकसान झाले. जनजीवन विस्कळीत झाले. पण याच पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात १२ लाख पाण्यात गेले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि शिवेश्वर सहकारी बँक जगद्गुरु पतसंस्थेच्या कार्यालयात पावसामुळे पाणी घुसले आणि थेट पाणी लॉकर पर्यंत पोहचले. त्यामुळे चक्क 12 लाख 22 हजार रुपयांचे नुकसान झाले. (due to monsoon rain as currency notes soaking 12 lakhs lost in hingoli)

12 लाख 22 हजारच्या नोटा पाण्यात भिजल्या सोबतच बँकेची महत्त्वाची कागदपत्रे भिजले. बँकेला पावसाचा हा खुप मोठा फटका म्हणावा लागेल. गेल्या कित्येक दिवसापासून हिंगोलीत पावसाचा जोर कायम आहे. हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आला. हे पाणी कुरुंदा गावात शिरले आणि थेट बँकेत पाणी शिरले.

सहसा पावसामुळे शेती, इमारती, रस्ते यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. पण इथे चक्क बँकेचे नुकसान होत १२ लाख पाण्यात गेल्याने सध्या हा चर्चेचा विषय ठरलाय.

राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं गावांचा संपर्क तुटलाय. काही घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या, घरांचं नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत राज्यात पावसानं 89 जणांचा मृत्यू झाला असून चार जण अजूनही बेपत्ता आहेत. तर, 181 जनावरांचाही मृत्यू झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

Sweat Energy : बॅटरी-चार्जरचं टेन्शन संपलं! शरीराच्या घामातून तयार होणार वीज; फक्त हातावर चिटकवा 'हे' स्टिकर अन् चार्जिंग फूल

‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला ! पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

Mughal History: सर्वात शक्तिशाली मुघल बादशहा होता समलैंगिक! तरण्याबांड पोराच्या प्रेमाखातर बायकोलाही सोडून दिलेलं

SCROLL FOR NEXT