Enforcement Directorate Seized Land In Hingoli esakal
मराठवाडा

कळमनुरीतील ३९ हेक्टर जमीन ED ने केली जप्त,मुंबईच्या पथकाची कारवाई

मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी सुमीत रॉय यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कळमनुरी (Kalamnuri) तालुक्यातील खापरखेडा व वाकोडी शिवारात गंगाखेड शुगर ॲण्ड एजन्सी लि . विजयनगर माकणीतर्फे नंदकिशोर शर्मा ( रा . उमरखेड ) या नावे असलेली सुमारे ३९ हेक्टर जमीन अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी (ता.चार) जप्त केली आहे. त्यामुळे आता या जमिनीवर अंमलबजावणी संचालनालयाचा ताबा राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाखेड शुगर ॲण्ड एजन्सी (Gangakhed Sugar And Agency) विजयनगर माकणी यांनी कळमनुरी तालुक्यातील वाकोडी व खापरखेडा शिवारात शेत जमीन खरेदी केली होती. या दोन्ही शिवारात पाच गटांमध्ये सुमारे ३९ हेक्टर जमीन खरेदी केली होती. या ठिकाणी साखर कारखाना (Hingoli) सुरु करण्याचा त्यांचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले होते. (Ed Seized 39 Hector Land In Kalamnuri Taluka Of Hingoli, Mumbai Team took action)

सुमारे सात ते आठ वर्षापुर्वी खरेदी केल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी (ता.चार) मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी सुमीत रॉय यांच्या पथकाने कळमनुरी येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालय गाठले. या ठिकाणी त्यांनी तहसीलदा सुरेखा नांदे यांच्याशी चर्चा करून वाकोडी व खापरखेडा शिवारातील गट क्रमांक व स्थळ निश्चितीसाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांना सोबत देण्याबाबत सांगितले. त्यावरून मंडळ अधिकारी किरण पावडे , खापरखेडा येथील तलाठी रेवता लुटे , वाकोडी येथील तलाठी गंगाधर पाखरे यांना सोबत घेऊन ईडीच्या पथकाने ३९ हेक्टर जमीन सील करून ताब्यात घेतली आहे.

या ठिकाणी ईडीचा फलक देखील लावण्यात आला आहे. दरम्यान, वाकोडी येथील गट क्रमांक ९८ मधील १०.९९ हेक्टर , गट क्रमांक ८६ मधील २.८४ हेक्टर , गट क्रमांक ८७ मधील ७.९९ हेक्टर जमीन सील केली आहे . तर खापरखेडा शिवारातील गट क्रमांक १४२ मधील १४ हेक्टर तर गट क्रमांक १३७ मधील ३.८० हेक्टर जमीन सील केली आहे. सदर जमिनीची सातबारा गंगाखेड शुगर अॅण्ड एजन्सी लि . विजयनगर माकणीतर्फे मुख्यारआम मुख्य शेतकी अधिकारी नंदकिशोर शर्मा (रा. उमरखेड) यांच्या नावे असल्याचे महसुल विभागातर्फे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT