download
download 
मराठवाडा

तंबाखूमुक्त शाळा मोहिमेत येथील शिक्षण विभाग नापास

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः सलाम मुंबई फाऊंडेशन, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय यांच्या पुढाकारातून गत वर्षभरात जिल्ह्यातील केवळ १२ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग या मोहिमेत नापास ठरला आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी बैठकावर बैठका घेतल्या होत्या. मात्र, तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी कुठल्याही हालचाली केल्या नसल्यामुळे केवळ बारा शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. त्यापुढे सरकल्या देखील नाहीत. सलाम मुंबई फाऊंडेशन व शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी दोन वर्षांपासून मोहीम हाती घेण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये केवळ १२ शाळा तंबाखूमुक्त झाल्या असल्याचे समोर आले आहे.

राज्यशासनाच्या कार्यक्रमाकडे शिक्षण विभागाने पाठ फिरविली
२०१८-१९ मध्ये केवळ बैठका घेऊन सोपस्कार पूर्ण केला गेला. यात एकही शाळा पूर्णपणे तंबाखूमुक्त झाली नाही. १२ शाळा प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जाते. हा कार्यक्रम राज्यस्तरावर चालू असलेल्या तंबाखूमुक्त शाळा अभियानातून राबविला जात आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांना वार्षिक लक्ष दिले आहे. त्यानुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्हास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रत्येक शाळेत जाऊन मार्गदर्शन करावयाचे असते. तर डिसेंबर महिण्यात विज्ञान प्रदर्शन, नाट्य याद्वारे जनजागृती करणे अपेक्षित असताना मार्गदर्शन तर सोडाच याबाबत शिक्षण विभागाने कुठलीही जनजागृती देखील केली नाही. राज्यशासनाच्या कार्यक्रमाकडे शिक्षण विभागाने पाठ फिरविली असल्याचे यावरून दिसून येते.

हिंगोली जिल्ह्यात मोहिमेला कुणी वाली नाही
राज्य शासनाच्या वतीने राज्यभरातील शाळा तंबाखूमुक्त करण्याची मोहीम जोमाने हाती घेण्यात आली असली तरीही हिंगोली जिल्ह्यात मात्र या मोहिमेला कुणी वाली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक अशा सर्व १२०० शाळा आहेत. त्यात प्राथमिक विभागाच्या ८५४, माध्यमिक १६१ व आदिवासी, समाजकल्याण, आणि इंग्रजी विभागाच्या १८६ शाळा आहेत. 

या शाळा झाल्या तंबाखूमुक्त 
जिल्ह्यात तंबाखूमुक्त झालेल्या शाळांत वसमत येथील जिल्हा परिषद शाळा, खंडेलवाल हायस्कूल या दोन शाळेचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील येवले हायस्कूल, औंढा येथील सिद्धेश्वर, शिरला, बाराशिव, तर कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी, तरोडा, कडपदेव, सांडस, मोरवड या शाळांचा समावेश आहे. तर हिंगोली तालुक्यातील घोटादेवी ही शाळा तंबाखूमुक्त झाली आहे. तंबाखूमुक्त शाळा करण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे. 

उर्वरित बारा शाळा तंबाखूमुक्त होणार
तंबाखूमुक्त शाळा अभियानातून जिल्ह्यातील केवळ १२ शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून उर्वरित बारा शाळा ह्या तंबाखूमुक्त होण्यासाठी प्रगतीपथावर आहेत. ह्या शाळा देखील लवकरच तंबाखूमुक्त होतील. - विशाल अग्रवाल, नशाबंदी अध्यक्ष.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT