Beed Accident News esakal
मराठवाडा

अरुंद रस्त्याने आठ वर्षाच्या बालकाचा घेतला जीव, घरी जाताना घडली दुर्घटना

दूध घरी नेत असताना...

सकाळ वृत्तसेवा

किल्लेधारूर (जि.बीड) : येथील बस आगाराच्या समोर सकाळी केजवरून माजलगावला जाणाऱ्या ट्रॅक्टर खाली येऊन आठ वर्षीय बालकाचा चेंगरून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना अरुंद रस्ता असल्याने झाली आहे. अरुंद रस्त्यामुळे आणखीन कित्येक निष्पाप नागरिकांचे बळी जाणार आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनमधून येत आहे. येथील बस आगारासमोर केजवरून माजलगावकडे (Majalgaon) जाणारे ट्रॅक्टरच्या खाली चेंगरून शिवराज सुरवसे या बालकाचा जागीच मृत्यू झाला. सुरवसे यांचे बस आगाराच्या बाजूला जनावरांचा गोठा आहे. त्या जागेत त्यांचे जनावरे बांधले जातात. (Eight Years Child Died In Accident In Killedharur Of Beed)

सकाळी शिवराज व त्याची आजी दूध आणण्यासाठी गेले होते. सकाळी ९ च्या दरम्यान दूध काढून घराकडे परतत असताना केजवरून माजलगावला जाणारा भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टरच्या खाली शिवराज आल्याने त्याचा जागीच चेंगरून मृत्यू झालं. या घटनेनंतर जेसीबी यंत्राच्या साहाय्याने ट्रॅक्टर उचलून मृत बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. (Beed)

गर्दी नियंत्रण आणण्यासाठी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. आंबेडकर चौकातून घाटपाटीकडे अतिशय अरुंद रस्ता आहे. यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होतात. यात बऱ्याच निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. आणखीन किती बळी घेतल्या नंतर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे असा संतप्त सवाल नागरिक करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT