पिंपळगाव रेणुकाई : येथील स्वस्त धान्य दुकानाचा पंचनामा करताना तलाठी काळे, पोलिसपाटील गजेंद्र निकम आदी.  
मराठवाडा

पिंपळगाव रेणुकाईत रेशन दुकानांचा पंचनामा 

प्रकाश ढमाले

पिंपळगाव रेणुकाई  (जि.जालना) -  लॉकडाऊनच्या काळातही गरजूंना जादा दराने धान्य देणाऱ्या येथील तीनही स्वस्त धान्य दुकानांचा बुधवारी (ता. आठ) पंचनामा करण्यात आला.  

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात कुठलाही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानामधून धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे बरेच ग्रामस्थ मजुरी करून पोट भरणारे आहेत. त्यांच्या हाताला लॉकडाऊनमुळे काम नाही. अशा स्थितीतही हक्काचे धान्य रेशन दुकानदार जादा दराने विकून लूट करताना दिसत आहेत.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय, बीपीएल व प्राधान्य कुटुंब यांना स्वस्त धान्य दुकानदारांनी शासकीय दरात व प्रतिकार्ड ठरवून दिल्याप्रमाणे धान्य देणे बंधनकारक होते; मात्र येथे या नियमाची पायमल्ली करीत प्रतिकार्ड पाच किलो गहू व तीन किलो तांदूळ या प्रमाणात शंभर रुपये असे जादा पैसे घेऊन धान्य वाटप करण्यात आले होते.

याबाबत फकिरा लोखंडे, रामदास जाधव, भास्कर बोर्डे, रतन सिल्लोडे, विजय रंजाळ, अंकुश डाखुरकर, ज्ञानेश्‍वर नरवाडे, रतन बिरारे आदी ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. या तक्रारीवरून बुधवारी तलाठी एस. बी. काळे, पोलिसपाटील गजेंद्र निकम, कृषी सहायक अंकुश भोंबे, सोसायटीचे सचिव गजानन लोखंडे, समाधान देशमुख, शिवा आहेर, बाबूराव बेराड यांनी पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान काही रेशन दुकानदारांनी जादा दरात धान्य विकल्याची कबुली दिली. तर घेतलेले जादा पैसे पंचनामा होणार असल्याचे कळताच परतही केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार तीनही दुकानांचा पंचनामा करण्यात आला आहे. तीनही दुकानचालकांवर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. 
- एस. बी. काळे, तलाठी 

लॉकडाऊनमुळे आमची रोजंदारी बंद झाली आहे. घरात पैसा राहिला नाही. अशात शासन मदत देते; मात्र रेशन दुकानदार नेहमीच जादा दराने धान्य देत आहे. किमान आता तरी परिस्थिती पाहून त्यांनी नियमाप्रमाणे धान्य द्यावे. 
- फकिरा लोखंडे, ग्रामस्थ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT