HoneyTrap Ashti  sakal
मराठवाडा

HoneyTrap: आष्टीचा माजी आमदार हनीट्रॅपच्या जाळ्यात? व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; एक कोटींची मागीतली खंडणी

Marathawada Crime: नगरमधील दोन महिलांसह तीनजणांवर नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिरुद्ध धर्माधिकारी

Ashthi News: अश्लिल व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत येथील माजी आमदार भीमराव धोंडे यांना तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी नगरमधील दोन महिलांसह तीनजणांवर नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात आज (ता. २९) मध्यरात्री दीडच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आमदार धोंडे यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास स्वतः फिर्याद दिली असून आरोपी महिला कल्पना सुधीर गायकवाड (रा. नगर), महिला बांगर (पूर्ण नाव व पत्ता नाही), इस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बाॅक्सर (रा. नगर) यांनी संगनमत करून तुमची अश्लिल व्हिडिओ क्लीप आमच्याकडे आहे.

ती सोशल मिडियावर प्रसारीत करून तुमची बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू व तुमची राजकीय कारकिर्द संपवून टाकू अशी धमकी देत माजी आमदार धोंडे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

तसेच आरोपींपैकी ईस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बाॅक्सर याने आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून यातील २५ हजार रुपये स्वीकारले. हा प्रकार जानेवारी महिन्यापासून ता. २६ या कालावधीत नगरमधील हाॅटेल राॅयल येथे घडला. जूनपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या फिर्यादीनुसार वरील तीन आरोपींविरुद्ध नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षिका योगिता कोकाटे या करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT